जिल्ह्याचा पारा ४३ अंशांवर!
By Admin | Updated: April 19, 2017 01:10 IST2017-04-19T01:10:55+5:302017-04-19T01:10:55+5:30
वाशिम : जिल्ह्यातील तापमानात सोमवारपासून अचानक वाढ झाली आहे. सूर्यनारायण चांगलाच आग ओकत असून मंगळवार, १८ एप्रिल रोजी जिल्ह्यात ४३ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद घेण्यात आली.

जिल्ह्याचा पारा ४३ अंशांवर!
वाशिम : जिल्ह्यातील तापमानात सोमवारपासून अचानक वाढ झाली आहे. सूर्यनारायण चांगलाच आग ओकत असून मंगळवार, १८ एप्रिल रोजी जिल्ह्यात ४३ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद घेण्यात आली.
यासंदर्भात अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या उन्हाळ्यात सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसाच्या तापमानाने उच्चांक गाठला असून, ही स्थिती आणखी काही दिवस अशीच कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे सकाळी १० वाजेपासूनच शहरांमधील रस्ते निर्मनुष्य होत आहेत. अंगाची लाही लाही करणाऱ्या वातावरणामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेदेखील कठीण झाले आहे.