जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय ‘लॉकडाऊन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:40 IST2021-03-25T04:40:10+5:302021-03-25T04:40:10+5:30
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकाळात अन्य क्षेत्रांप्रमाणेच क्रीडा क्षेत्रालाही जबर फटका बसला. गतवर्षी मार्च महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत जिल्हा क्रीडांगण कुलूपबंद ...

जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय ‘लॉकडाऊन’
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकाळात अन्य क्षेत्रांप्रमाणेच क्रीडा क्षेत्रालाही जबर फटका बसला. गतवर्षी मार्च महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत जिल्हा क्रीडांगण कुलूपबंद राहिले. सोबतच कुठल्याही खेळांचे आयोजन करण्यात आले नाही. ९ जानेवारी रोजी महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने जिल्हास्तरीय कनिष्ठ गट अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात आली; मात्र फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने क्रीडा स्पर्धांना ‘ब्रेक’ लागला. दरम्यान, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातील सहा कर्मचारीदेखील कोरोना बाधित आढळले असून भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे दिवसभरातून अनेकवेळ कार्यालय बंदच राहत असल्याचे दिसून येत आहे.
................
बाॅक्स :
जिल्हा क्रीडाधिकारी प्रभारी
तत्कालिन जिल्हा क्रीडाधिकारी प्रदीप शेटीये सेवानिवृत्त झाल्यानंतर चंद्रकांत उप्पलवार यांच्याकडे या पदाचा प्रभार सोपविण्यात आला. उप्पलवार हे कारंजा व मानोरा या दोन तालुक्यांचे तालुका क्रीडाधिकारी म्हणून काम पाहत असून त्यांना जिल्हा क्रीडाधिकारी पदाचाही कार्यभार सांभाळावा लागत आहे. यामुळे ते वाशिम येथे नियमित सेवा देत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.