जिल्हा नियोजन समितीची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:30 IST2021-02-05T09:30:10+5:302021-02-05T09:30:10+5:30
------------------------- ३८ शेतकऱ्यांची कृषीपंप जोडणी रखडली केनवड : कृषीपंप जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज करूनही केनवड परिसरातील ३८ शेतकऱ्यांना कृषीपंप जोडणी ...

जिल्हा नियोजन समितीची सभा
-------------------------
३८ शेतकऱ्यांची कृषीपंप जोडणी रखडली
केनवड : कृषीपंप जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज करूनही केनवड परिसरातील ३८ शेतकऱ्यांना कृषीपंप जोडणी मिळाली नाही. यामुळे सिंचनापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे.
---------------------------
वाहतूक शाखेकडून कारवाईची मोहीम
रिठद : वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वाहतूक कर्मचाऱ्यांनी वाशिम-रिसोड मार्गावरील वांगी, मोहोजा फाटा, सिरसाळा फाटा येथे २४ व २५ जानेवारी रोजी कारवाईची मोहीम राबवून ५६ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली.
------------------
अडोळी येथे आरोग्य तपासणी
तोंडगाव : वाशिम तालुक्यातील अडोळी येथे एका जणाचा कोरोना चाचणी अहवाल २४ जानेवारी रोजी पॉझिटिव्ह आढळला. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने संदिग्ध रुग्णांची तपासणी केली असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले.
---------------------------
शौचालय बांधकामाला गती देण्याच्या सूचना
अनसिंग : ३१ जानेवारीपर्यंत शौचालय बांधकाम पूर्ण करावे लागणार असून, अनसिंग जिल्हा परिषद गटातील लाभार्थींनी शौचालय बांधकामाला गती द्यावी, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाने २५ जानेवारी रोजी दिल्या.