जिल्ह्यातील १४९ गावांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 20:14 IST2017-09-12T20:14:00+5:302017-09-12T20:14:00+5:30
गेल्या १५ वर्षांपासुन राज्यातील शेती क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. लहरी हवामानामुळे शेती क्षेत्रावर होणारे बदल तसेच विविध समस्यांमुळे कृषी उत्पादकता कमी झाली आहे. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्याचा निर्णय मुख््यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असुन हा प्रकल्प येत्या ६ महिन्यात पुर्ण होणार आहे. राज्यातील ५००० हजार गावे प्रकल्पात समाविष्ट करण्यात आली असुन वाशिम जिल्ह्यातील १४९ गावांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील १४९ गावांचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गेल्या १५ वर्षांपासुन राज्यातील शेती क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. लहरी हवामानामुळे शेती क्षेत्रावर होणारे बदल तसेच विविध समस्यांमुळे कृषी उत्पादकता कमी झाली आहे. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्याचा निर्णय मुख््यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असुन हा प्रकल्प येत्या ६ महिन्यात पुर्ण होणार आहे. राज्यातील ५००० हजार गावे प्रकल्पात समाविष्ट करण्यात आली असुन वाशिम जिल्ह्यातील १४९ गावांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी दिली आहे.
येत्या तिन वर्षात या गावांमध्ये दृष्यस्वरूपातील बदल दिसणार आहेत. जागतिक बँकेने देखील हा प्रकल्प फास्ट ट्रॅकवर घेतला असुन येत्या सहा महिन्यात हा प्रकल्प प्रत्यक्षात सुरू करावा असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील पिलखेडा,यावार्डी, कार्ली, मोहगव्हाण, अलीमदार्पुर, पिंप्री वरघट, गणेशपुर, नारेगाव, उंबर्डा, येवता, धानोरा ताथोड, झोडगा, ब्राम्हणवाडा, धनज खु, मोरपुर, वडगाव रंगे, दोनद बु., मनभा, दुघोरा, वाघोळा, धामणी, शेलु बु, सोहळ, वडगाव इजारा, गायवळ, वाई कारंजा, वढवी, इसफपुर, किसाननगर, देवचंडी, किनखेड, लोहारा, मांडवा आदी गावांचा समावेश करण्यात आला आहे. तर मानोरा तालुक्यातील धावंडा, पाळोदी, वसंतनगर, पोहरादेवी, रतनवाडी, गोगजई, काकड चिखली, पिंपळशेंडा, पुष्ठलउमरी, उमरी खु,सावळी, मेंद्रा, गोस्ता, रंजीतनगर, रेणकापुर, बिडगाव, सय्यदपुर, अजनी, भांडेगाव,दारा,नायनी, दहीठाणा, जनुना खु, म्हसणी, भोयणी, चौसळा, गारटेक, गव्हा, कारपा, कारखेडा, विठोली, आसोला खु, चौकुर, उज्वल नगर, भुली, आमदरी, गलमगाव, हातोली आदी गावांचा समावेश आहे.
हवामानाकुल कृषी पध्दतीस प्रोत्साहन देणे यामध्ये सहभागीय पध्दतीने गाव समुहाचा (लघु पाणलोट) नियोजन आराखडा विकसीत करणे, हवामानाकुल आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके, जमिनीत कर्ब ग्रहणाचे प्रमाण वाढविणे, क्षारपड व चोपण जमिनीचे व्यवस्थापन, संरक्षित शेती, पाण्याचा कार्यक्षम व शाश्वतत पध्दतीने वापर ज्यामध्ये मुलस्थानी जलसंधारण, ओघळीवरचे उपचार, पाणी साठवण संरचनांची निर्मिती, जुन्या जलसाठयांचे पुनरूज्जीवन, भूजल पुनर्भरण, सुक्ष्म सिंचन काढणी पश्चात व्यवस्थापन व कृषीमूल्य साखळीचे बळकटीकरण करणे यामध्ये शेतकरी उत्पादक वंष्ठपन्यांची निर्मिती, भाडे तत्वावर कृषी अवजारे वेंष्ठद्र सुविधा निर्मिती, शेतीमालाचे संकलन, हाताळणी, मुल्यवृध्दी विक्री आदीबाबत सहाय्य करणार आहे. बियाणे वितरण प्रणालीची कार्यक्षमता वृध्दींगत करणे, सीड हबसाठी पायाभुत सुविधांची निर्मिती, स्थानिक परिस्थितीनुसार व पिकनिहाय कृषि हवामान सल्ला, पीक पध्दतीत बदलाबाबत शेतकठयांना प्रोत्साहन, हवामानाकुल वाण, जमिनीतील ओलावा जतन करणे हा आहे. प्रकल्पाची वैशिष्टांमध्ये प्रकल्पांतर्गत समुह पध्तीने गावांची निवड, महसूल मंडळ निहाय उभारणी करण्यात येणाठया स्वयंचलित हवामान वेंष्ठद्राकडुन प्राप्त होणाºया माहितीस अनुसरून शेतकºयांना कृषी हवामान सल्ला, शिवारातील पाण्याच्या ताळेबंदीनुसार पीक नियोजन करणे. यासाठी जागतीक बँकेचा वाटा २८०० कोटी तर राज्यशासनाचा १२०० कोटी रुपये असा एकुण चार हजार कोटी रूपयांचा हा प्रकल्प आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची उद्दिष्टे
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची उद्दिष्टे हवामान बदलास अनुसरून कृषी पध्दती विकसीत करणे, अल्प व अत्यल्प शेतकठयांच्या कृषी उत्पादकतेत वृध्दी करणे, शेतकठयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी मुल्य साखळीमध्ये त्याचा सहभाग वाढविणे तसेच राज्यातील अवर्षणग्रस्त व खारपाण पट्टा जमीनी असलेल्या जिल्ह्याचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.
राज्यातील १५ जिल्हयांचा समावेश
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये राज्यातील अमरावती, अकोला, वाशिम, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, जळगाव, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी, िंहगोली, नांदेड व लातुर या १५ जिल्ह्यांचा समावेश आहे.