रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी परवान्यांचे वितरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 15:15 IST2017-10-18T15:14:22+5:302017-10-18T15:15:58+5:30

रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी परवान्यांचे वितरण!
वाशिम: आगामी रब्बी हंगामात पिकांसाठी सिंचन प्रकल्पांमधून पाणीवापराकरिता लागणाºया परवान्यांचे वितरण आमदार अमीत झनक यांच्याहस्ते रिसोड तालुक्यातील शेतकºयांना बुधवारी करण्यात आले. याकामी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी पुढाकार घेतला.
प्रथम प्राधान्याने वाकद सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले असून आगामी रब्बी हंगामाकरिता या प्रकल्पामधील पाणी वापरासाठी मोकळे झाले आहे. त्यानुषंगाने बुधवारी एकलासपूर (ता.रिसोड) येथे शेतकºयांची बैठक घेवून संबंधितांना पाणीवापर परवान्यांचे रितसर वितरण करण्यात आले. पिकांसाठी हक्काचे पाणी मिळणार असल्याने यावेळी उपस्थित शेतकºयांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, पाण्याचा काटकसरीने वापर करून सरासरी उत्पन्नात शेतकºयांनी वाढ करावी, असे आवाहन यावेळी कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी केले.