काजळेश्वर येथे आदिवासी वस्तीत साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:41 IST2021-07-31T04:41:06+5:302021-07-31T04:41:06+5:30
काजळेश्वर सर्कलचे पंचायत समिती सदस्य रंगराव धुर्वे यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला यांचेकडे गरजूंना खावटी मिळावी करीता पाठपुरवठा ...

काजळेश्वर येथे आदिवासी वस्तीत साहित्य वाटप
काजळेश्वर सर्कलचे पंचायत समिती सदस्य रंगराव धुर्वे यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला यांचेकडे गरजूंना खावटी मिळावी करीता पाठपुरवठा केला . त्यानुसार काजळेश्वर येथील गरजू ८१ लाभार्थ्यांना
दोन हजार रुपयाची अत्यावश्यक
साहित्याची किट व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट दोन हजार रुपये पाठवून लाभ दिला . याप्रसंगी आदिवासी विभागाचे जी. एच. राठोड , एम. आर. ठाकरे , पी . डी. चित्रावार,
पी. एच . मोहेकर, पी. व्ही. वानखडे यांचेसह पं. स. सदस्य रंगराव धुर्वे , जि. प. सदस्य अशोकराव डोंगरदिवे ,
माजी ग्रा. पं. सदस्य जम्मूभाई , ज्ञानदेव तोडासे , गोलू धुर्वे इत्यादी मान्यवरांची
व्यासपीठावर उपस्थिती होती . कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वानदास धुर्वे यांनी केले . अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली .आदिवासी तरुणांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास प्रयत्न केले .
कोट :
गोंड समाजातील गरजूंची खावटी करीता आदिवासी विभागातर्फे सर्वेक्षण केल्यानंतर
अत्यावश्यक कागदपत्रे देऊन प्रस्ताव सादर करण्यात आले होते .गरजूंना खावटी मिळावी करीता पाठपुरावा आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांशी केला . १३१ प्रस्ताव दाखल झाले मात्र परिपूर्ण असलेले ८१ प्रस्ताव मंजूर झाले . त्यांना आदिवासी कार्यालयाकडून लाभ दिल्या गेला .
रंगराव धुर्वे,
कारंजा पंचायत समिती सदस्य, काजळेश्वर सर्कल .