गावागावात कामगारांना जॉब कार्डचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:39 IST2021-02-13T04:39:59+5:302021-02-13T04:39:59+5:30

--------- अनसिंगचे पोलीस पाटील पद रिक्तच अनसिंग : येथील पोलीस पाटलाचे पद गत दोन वर्षांपासून रिक्त आहे. ते भरण्यासंबंधी ...

Distribution of job cards to workers in villages | गावागावात कामगारांना जॉब कार्डचे वितरण

गावागावात कामगारांना जॉब कार्डचे वितरण

---------

अनसिंगचे पोलीस पाटील पद रिक्तच

अनसिंग : येथील पोलीस पाटलाचे पद गत दोन वर्षांपासून रिक्त आहे. ते भरण्यासंबंधी संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केले असून, अनसिंग येथील ग्रामस्थांना विविध महत्त्वाची कागदपत्रे व दाखले मिळविण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.

-------

वनोजा फाट्यावरील हातपंप बंद

वनोजा : येथील फाट्यावरील हातपंप गत अनेक दिवसांपासून बंद आहे. उन्हाळ्यात ये-जा करणाऱ्या वाटसरूंना हातपंपावर पिण्यासाठी पाणी मिळावे, ही बाब लक्षात घेता हा हातपंप त्वरित दुरुस्त करण्याची मागणी गावकऱ्यांकडून गुरुवारी करण्यात आली.

^^^

शेतकरी नुकसान पीक भरपाईपासून वंचित

मेडशी : गतवर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यात मेडशी परिसरातील १६८६ शेतकऱ्यांना फटका बसला. तथापि, अद्यापही ४४२ शेतकरी वंचित आहेत.

---

शेतकऱ्यांची रोहयोची देयके थकीत

वाशिम : सन २०१९ मध्ये रोहयोंतर्गत विहीर बांधकाम दुरुस्ती केलेल्या ‘कुशल’ची देयके अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे संबंधित शेतकरी हैराण झाले आहेत. प्रशासनाने दखल घेऊन रोहयोची देयके अदा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी गुरुवारी केली.

Web Title: Distribution of job cards to workers in villages