आदिवासींना गॅसचे वितरण
By Admin | Updated: August 8, 2014 00:21 IST2014-08-07T23:54:45+5:302014-08-08T00:21:59+5:30
वन ग्राम परिसर विकास समिती वसाली अंतर्गत गॅस वितरण करण्यात आले.

आदिवासींना गॅसचे वितरण
संग्रामपूर : अंबाबरवा या आदिवासी गावामध्ये वन ग्राम परिसर विकास समिती वसाली अंतर्गत गॅस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आ.डॉ.संजय कुटे हे होते. आदिवासी बांधवांसाठी गॅसची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. यावेळी सेनेचे उपजिल्हाप्रमुख जानराव देशमुख, तहसिलदार काझी, सहाय्यक उपवनसरक्षक वन्यजीव अकोटचे पारडीकर, नरनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी नानोटे, सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी जी.व्ही. अढाव यांचेसह गोपाल कासदेकर, हुसेन पालकर, हिंमतराव धांडेकर, जांभळे, नवल पालकर, वनपाल आर.के. खोडे, वनरक्षक मेहत्रे, सलामे, सोळंके, पडवळ, नारखडे, पांडे, शेख, अनिल केदार, समीर सुरत्ने, गोकुल मोहीते, शिवदास काकडे, केरू गाडर्या, सरदार आदिंजण उपस्थित होते. हा कार्यक्रम उपवनसंरक्षक अकोटचे वर्मा यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.