विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 16:00 IST2019-02-11T16:00:29+5:302019-02-11T16:00:40+5:30
वाशिम : विद्यापीठाच्या निर्दशाप्रमाणे स्थानिक अॅड. रामकृष्ण राठी विधी महाविद्यालयामध्ये ९ फेब्रुवारी रोजी पदवी प्रमाणपत्राचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विद्यापीठाच्या निर्दशाप्रमाणे स्थानिक अॅड. रामकृष्ण राठी विधी महाविद्यालयामध्ये ९ फेब्रुवारी रोजी पदवी प्रमाणपत्राचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
दरवर्षी ज्या विद्यार्थ्यांनी पदवी पुर्ण केलेली आहे अश्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाव्दारे पदवी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येत होते. परंतु या वर्षीपासुन पदवी प्रमाणपत्र महाविद्यालयात वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार सन २०१६-१७ व २०१७-१८ च्या विधी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हया कार्यक्रमात पदवीका प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. न. अ. कादरी तर प्रमुख पाहुणे म्हणुन राजस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलन संचेती , ज्येष्ठ विद्यीज्ञ अॅड.छाया मवाळ या होत्या. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी डॉ.संचेती यांनीविधी पदवी वरच न थांबता पुढील शिक्षण सुध्दा घेवून मोठया पदावर कार्य करावे अशी आशा बाळगली. तसेच अॅड. मवाळ यांनी विद्यार्थ्यांनी पदवीनंतर वकिली करत असतांनी कशी नित्य नियम पाळवीत व वकील व्यवसाय हा समाज उपयोगी कसा राहील. या बाबत सुध्दा दक्षता घ्यावे असे मोलाचे मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात डॉ.कादरी यांनी शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नेहमी तळमळ करत असतात त्यानुसारच विद्यार्थ्यांनी सुध्दा अशा प्रकारची भावना ठेवावी व शिक्षकांना अभिमान वाटले असे कार्य करीत रहावे असे प्रतिपदन केले.
कार्यक्रमाचे आयोजन प्रा.डॉ.सागर सोनी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी किशोर पडघान यांनी केले. तर आभार विद्यार्थी अविनाश खंडारे यांनी व्यक्त केले. सदरील कार्यक्रमाला प्रा.सुशांत चिमणे,प्रा. एल.डी.दाभाडे,प्रा. भाग्यश्री धुमाळे, ग्रंथपाल संजय ईढोळे मुख्य लिपीक एम.एन, सोमाणी डी.बी.गवई,राहुल पांडे,जितेश अग्रवाल उपस्थिती होते. तसेच हया कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती व उत्सफुर्त प्रतिसाद लाभला.