जिल्हा बँकेकडून ७० टक्के पीककर्ज वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:28 IST2021-07-10T04:28:21+5:302021-07-10T04:28:21+5:30

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खतांसाठी लागणारी रक्कम उपलब्ध व्हावी म्हणून पीक कर्ज दिले जाते. दरवर्षी सरकारकडून बँकांना ...

Distribution of 70% peak loan from District Bank | जिल्हा बँकेकडून ७० टक्के पीककर्ज वितरण

जिल्हा बँकेकडून ७० टक्के पीककर्ज वितरण

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खतांसाठी लागणारी रक्कम उपलब्ध व्हावी म्हणून पीक कर्ज दिले जाते. दरवर्षी सरकारकडून बँकांना शेतकऱ्यांना पीक कर्जाचे अधिकाधिक वाटप करावे, म्हणून आदेश दिले जातात. मात्र, सहकारी बँका वगळता खासगी आणि व्यापारी बँकांकंडून शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना टाळाटाळ केली जाते. यंदाही असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी खासगी आणि व्यापारी बँकांचे उंबरठे झिजवायला लागत असल्याचे चित्र आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.

--------

जिल्ह्यासाठी १०२५ कोटींचे उद्दिष्ट

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात १०२५ कोटींचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. दरम्यान, ३ जुलैपर्यंत विदर्भ ग्रामीण कोकण आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून त्यांना देण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या ७० टक्क्यांच्या आसपास पीक कर्ज वाटप झाले असून, त्यांनी ५६९७० शेतकऱ्यांना ४३५ कोटी ९५ लाख रुपये पीककर्ज वितरित केले आहे.

-------------

राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांवर शेतकऱ्यांचा संताप

राष्ट्रीयीकृत, खासगी बँकांचे पीक कर्ज वाटपाचे प्रमाण ४३ टक्क्यांच्या आत असून, या बँकांनी १५०८९ शेतकऱ्यांना १३८ कोटी ९८ लाख रुपयांच्या पीककर्जाचे वितरण केले आहे. या बँकांचे उंबरठे झिजवूनही शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. पीक कर्जासाठी वारंवार बँकांचे उंबरठे झिजवायला लागत असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

---------

बॉक्स :

७८, ९०५ शेतकऱ्यांना खरीप पीककर्जाचा लाभ

६४४ ६६.६१ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप

Web Title: Distribution of 70% peak loan from District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.