रुई येथे गरजू, गरिबांना ब्लँकेट वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:36 IST2021-01-18T04:36:18+5:302021-01-18T04:36:18+5:30
वाशिम : पोलीस स्थानक आसेगाव अंतर्गत रुई येथे यवतमाळ येथील दिनबंधू बहुउद्देशीय संस्थेकडून गरजू, गरिबांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. ...

रुई येथे गरजू, गरिबांना ब्लँकेट वितरण
वाशिम : पोलीस स्थानक आसेगाव अंतर्गत रुई येथे यवतमाळ येथील दिनबंधू बहुउद्देशीय संस्थेकडून गरजू, गरिबांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गावातील गुरुदेव सेवा आश्रमात शनिवारी हा कार्यक्रम पार पडला.
यवतमाळ येथील दिनबंधू बहुउद्देशीय संस्था आणि पुसद येथील माणुसकीची भिंत सोशल फाऊंडेशनकडून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांचा एक भाग म्हणून दोन्ही संस्थांनी मानोरा तालुक्यातील रुई येथील गुरुदेव सेवाश्रमात ब्लँकेट वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या अंतर्गत गावातील गरीब, गरजू कुटूंबांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. पंकजपाल महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी गजानन माऊली महाराज, देविदास गावंडे महाराज, हरी महाराज, अशोक रनबावळे, दिलीप पाटील, नंदू भोयर, युवराज राठोड, कैलास राऊत, पांडुरंग राऊत, आदी उपस्थित होते.
===Photopath===
170121\17wsm_1_17012021_35.jpg
===Caption===
रुई येथे गरजू, गरीबांना ब्लँकेट वितरण