धानोरा ते आसेगाव रस्त्याची दूरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:41 IST2021-07-31T04:41:24+5:302021-07-31T04:41:24+5:30
-------- फवारणीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन वाशिम : जिल्ह्यातील गावांत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. ...

धानोरा ते आसेगाव रस्त्याची दूरवस्था
--------
फवारणीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वाशिम : जिल्ह्यातील गावांत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. गत २५ जुलैपासून हा उपक्रम सुरू आहे. कृषी सहाय्यक, मंडल कृषी अधिकारी शेतांवर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
-----------
जडवाहनांमुळे ग्रामीण रस्त्याची दैना
वाशिम : कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागांतील विविध रस्त्यांवरून समृद्धी महामार्गाच्या कामासाठी गौणखनिज नेणारी जडवाहने सतत धावत असल्याने या रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. याची दखल घेण्याची मागणी होत आहे.
------------
दिशादर्शक फलकाअभावी चालकांची दिशाभूल
वाशिम : मानोरा तालुक्यातील कारपा ते मानोरा मार्गाला जोडणाऱ्या आसोला खु. फाट्यावर दिशादर्शक फलक नाही. त्यामुळे या मार्गाने मानोरा किंवा शेंदुरजना आढावकडे जाणाऱ्या नव्या चालकांत संभ्रम निर्माण होऊन त्यांचा मार्ग चुकत आहे.
^^^^^^^^^^
एकाच दिवशी तीन सापांना जीवदान
वाशिम : निसर्ग स्पर्श फाऊंडेशन प्रणित वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमच्या सर्पमित्र सदस्यांनी सोमवारी नाग आणि मण्यार या दोन विषारी सापांसह धामण जातीच्या बिनविषारी सापाला सुरक्षित पकडून जंगलात सोडून दिले. विठोबा आडे, शुभम सावळे, शिवा भेंडे, श्रीकांत डापसे यांनी हे साप पकडले.
------------
आशा, गटप्रवर्तकांचे मानधन वाढविण्याची मागणी
वाशिम : कोरोना संसर्गाच्या काळात जीव धोक्यात घालून शासन, प्रशासनाने सोपविलेली जबाबदारी खंबीरपणे पार पाडणाऱ्या आशा सेविका, गटप्रवर्तक व बीसीएम यांच्या मानधनात समाधानकारक वाढ करून त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी आयटक संघटनेकडून होत आहे.