भारिप-बहुजन महासंघाच्या सर्व शाखा बरखास्त

By Admin | Updated: March 16, 2017 02:51 IST2017-03-16T02:51:25+5:302017-03-16T02:51:25+5:30

भारिपचे वाशिम जिल्ह्याध्यक्ष युसूफ पुंजाणी यांची माहिती.

Dismissed all the branches of the Bharip-Bahujan Mahasangh | भारिप-बहुजन महासंघाच्या सर्व शाखा बरखास्त

भारिप-बहुजन महासंघाच्या सर्व शाखा बरखास्त

वाशिम, दि. १५- भारिप-बहुजन महासंघ पक्षाची पुनर्बांंधणी व पक्ष वाढीसाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार भारिप-बहुजन महासंघाच्या वाशिम जिल्ह्यातील सर्व शाखा बरखास्त केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मो. युसूफ पुंजाणी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे बुधवारी दिली. सर्व नवीन शाखा निवडीमध्ये सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल व ज्येष्ठ कार्यकर्ते, युवा पिढी तसेच महिलांनासुद्धा सन्मान देण्यात येईल, अशी माहिती पुंजाणी यांनी दिली. पक्षाच्या कार्यक र्त्यांनी पक्षाची एखादी जबाबदारी स्वीकारायची इच्छा असल्यास संबंधित शाखेत येत असलेल्या कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊन लोकशाही मार्गाने आपले मत स्वत:हून सादर करण्याचे आवाहनही जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजाणी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.

Web Title: Dismissed all the branches of the Bharip-Bahujan Mahasangh