शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवर ३० नोव्हेंबरला होणार चर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 10:21 PM2017-11-24T22:21:29+5:302017-11-24T22:27:31+5:30

शिक्षण उपसंचालक, अमरावती यांच्या दालनात गुरूवार, ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या, अडचणींबाबत चर्चा केली जाणार आहे.

Discussions on pending demands of teachers will be held on November 30! | शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवर ३० नोव्हेंबरला होणार चर्चा!

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवर ३० नोव्हेंबरला होणार चर्चा!

googlenewsNext
ठळक मुद्देअमरावतीत सहविचार सभाविदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शिक्षण उपसंचालक, अमरावती यांच्या दालनात गुरूवार, ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या, अडचणींबाबत चर्चा केली जाणार आहे. अमरावती विभागातील विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी याकामी पुढाकार घेवून सहविचार सभेचे आयोजन केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष व्ही.यू.डायगव्हाणे व विमाशीचे प्रांतीय अध्यक्ष एस.जी.बरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाºया या सहविचार सभेत उपस्थिती करावयाचे मुद्दे संबंधित समस्याग्रस्त शिक्षकांनी लेखी स्वरूपात वाश्मि जिल्हा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांकडे सादर कराव्या, असे आवाहन प्रांतीय सदस्य जनार्दन शिंदे, कार्यवाह गोविंद चतरकर, अध्यक्ष राजेश नंदकुले, नारायण मगर, आढाव, राजेश खाडे, बाळासाहेब गोटे, जी.एन. ओव्हर, कुलदिप बदर, वसंतराव अवचार आदिंनी केले आहे. 

Web Title: Discussions on pending demands of teachers will be held on November 30!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक