पदोन्नतीबाबत शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:24 IST2021-07-24T04:24:07+5:302021-07-24T04:24:07+5:30

वाशिम जिल्हा परिषदेने यापूर्वी सन २०१७ मध्ये शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या पदोन्नत्या केल्या होत्या. परंतु मध्यंतरीच्या काळात या पदोन्नत्या ...

Discussion with the Education Officer regarding promotion | पदोन्नतीबाबत शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा

पदोन्नतीबाबत शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा

वाशिम जिल्हा परिषदेने यापूर्वी सन २०१७ मध्ये शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या पदोन्नत्या केल्या होत्या. परंतु मध्यंतरीच्या काळात या पदोन्नत्या परत केल्या गेल्या नसल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केल्या जात आहे. नव्यानेच रुजू झालेले शिक्षणाधिकारी रमेश तांगडे यांची शिक्षकांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीमध्ये तांगडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या पदोन्नतीबाबत शिक्षकांनी १० जून २०१४ ची अधिसूचनादेखील शिक्षणाधिका-यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी शिक्षणाधिकारी तांगडे यांनी यावर आपण सकारात्मक विचार करून पुढील कार्यवाही करू, असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्तराव इढोळे, जिल्हा नेते विलासराव गोटे, आत्माराम आरू, स्वाती इंगाले, साने गुरुजी शिक्षक संघटनेचे नारायणराव सरनाईक यांच्यासह आदी शिक्षकांची उपस्थिती होती.

....

राष्ट्रवादी शिक्षक संघटनेची विविध विषयांवर चर्चा

राष्ट्रवादी शिक्षक संघटनेने पदाेन्नतीबाबत चर्चा करताना इतरही शिक्षकांच्या समस्यांबाबत शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा केली.

Web Title: Discussion with the Education Officer regarding promotion