तांत्रिक अडचणीने ‘डिजिटल सातबारा’ प्रक्रिया मंदावली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 06:22 PM2018-06-17T18:22:09+5:302018-06-17T18:22:09+5:30

वाशिम : डिजिटल सातबारा प्रक्रियेतंर्गत राज्य शासनाने सुरू केलेले पोर्टल तांत्रिक बिघाडामुळे गत २० दिवसांपासून बंद पडल्याने सदर प्रक्रिया मंदावली आहे.

'Digital Satbara' process slow down due to technical difficulties | तांत्रिक अडचणीने ‘डिजिटल सातबारा’ प्रक्रिया मंदावली !

तांत्रिक अडचणीने ‘डिजिटल सातबारा’ प्रक्रिया मंदावली !

googlenewsNext
ठळक मुद्देतांत्रिक बिघाडामुळे आॅनलाईन सात-बारा प्रक्रियेत व्यत्यय निर्माण होत आहेत. तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी झालेले सातबारा दस्तऐवज महाभूलेख संकेतस्थळावर उपलब्धही करण्यात आले आहेत.तांत्रिक बिघाडामुळे गत २० दिवसांपासून बंद असल्याने डिजिटल स्वाक्षरी झालेले सातबारा या पोर्टलवर टाकणे बंद आहे.


वाशिम : डिजिटल सातबारा प्रक्रियेतंर्गत राज्य शासनाने सुरू केलेले पोर्टल तांत्रिक बिघाडामुळे गत २० दिवसांपासून बंद पडल्याने सदर प्रक्रिया मंदावली आहे. वाशिम जिल्ह्यातील ८०९ गावांतील २ लाख ४९ हजार सातबारांपैकी ४९ टक्के सातबारांवर तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी होऊन हे सातबारा महाभूलेख संकेतस्थळावर अपलोडिंगसाठी तयार झाले आहेत.
सातबारा प्रक्रियेला आॅनलाईनची जोड दिली जात आहे. तांत्रिक बिघाडामुळे आॅनलाईन सात-बारा प्रक्रियेत व्यत्यय निर्माण होत आहेत. अनेक ठिकाणी इंटरनेट स्पीड, वीज अशा सुविधांचा अभाव आहे. त्यातही आॅनलाईन सात-बारा उताºयाची प्रिंट मिळाली तरी तो आहे तसा बँक किंवा न्यायालयीन कामकाजात आहे तसा वापरता येत नाही. त्यावर पुन्हा तलाठ्याचा सहीशिक्का आवश्यक असतो. तलाठ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा आॅनलाईन पद्धतीने देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहिम हाती घेतली आहे. तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी झालेले सातबारा दस्तऐवज महाभूलेख संकेतस्थळावर उपलब्धही करण्यात आले आहेत. तथापि, शासनाकडून सुरू करण्यात आलेले पोर्टल तांत्रिक बिघाडामुळे गत २० दिवसांपासून बंद असल्याने डिजिटल स्वाक्षरी झालेले सातबारा या पोर्टलवर टाकणे बंद आहे. दरम्यान, या प्रक्रियेत वाशिम जिल्ह्यात ८०९ गावांतील २ लाख ४९ हजार सातबारांवर तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी करण्यात येणार  आहे. सद्यस्थितीत ४९ टक्के काम पूर्ण केले आहे.

Web Title: 'Digital Satbara' process slow down due to technical difficulties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.