उत्पन्नाच्या डिजिटल दाखल्याचा प्रयोग यशस्वी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 12:25 PM2021-01-11T12:25:08+5:302021-01-11T12:25:39+5:30

Income Certificate तलाठी दत्तराव माळेकर यांनी एक सॅाप्टवेअर बनवून विद्यार्थ्यांना लागणारे उत्पन्नाचे दाखले ‘डिजिटल’  स्वरूपात उपलब्ध करून दिले आहेत.  

Digital Proof of Income Certificate Successful! | उत्पन्नाच्या डिजिटल दाखल्याचा प्रयोग यशस्वी!

उत्पन्नाच्या डिजिटल दाखल्याचा प्रयोग यशस्वी!

googlenewsNext

 लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : तहसीलमार्फत देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांना ऑनलाइनची जोड मिळाली आहे; मात्र तलाठी यांच्यामार्फत देण्यात येणारे दाखले हे हस्तलिखित देण्याची पद्धत आहे. केकतउमरा येथील तलाठी दत्तराव माळेकर यांनी तंत्रज्ञानाचा वापर करीत एक सॅाप्टवेअर बनवून विद्यार्थ्यांना लागणारे उत्पन्नाचे दाखले ‘डिजिटल’  स्वरूपात उपलब्ध करून दिले आहेत.  
या डिजिटल दाखल्याचे वितरण तहसीलदार विजय साळवे यांच्या हस्ते केकतउमरा येथील विठाबाई पसारकर विद्यालयात करण्यात आले. 
यावेळी तहसीलदार साळवे म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाचा दाखला अत्यावश्यक असतो. अनेकदा हा दाखला वेळेवर मिळत नाही. बाहेरगावी असणाऱ्या विद्यार्थ्यांना या छोट्याशा कामासाठी गावाकडे परत यावे लागते. या नवीन उपक्रमामुळे विद्यार्थी मोबाइलद्वारे तलाठी यांना उत्पन्नाचा दाखला मागण्यासाठी ‘रिक्वेस्ट’ पाठवू शकणार आहेत व तलाठी त्या विद्यार्थ्याला मोबाइलवर डिजिटल स्वाक्षरी असलेला उत्पन्नाचा दाखला पीडीएफ स्वरूपात पाठवू शकतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ व पैशाची बचत होणार असल्याचे तहसीलदार साळवे म्हणाले. केकतउमरा येथील तलाठी माळेकर यांचा उत्पन्नाच्या डिजिटल दाखल्याचा प्रयोग हा राज्यातील पहिला असल्याचा दावाही यावेळी साळवे यांनी केला. माळेकर यांनी  तयार केलेल्या सॉफ्टवेअरबद्दल माहिती दिली.  शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षा पसारकर व संस्थचे सहसचिव अविनाश पसारकर यांनीही विचार व्यक्त केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह मान्यवरांची उपस्थिती होती.

Web Title: Digital Proof of Income Certificate Successful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.