शेगावात धनगर समाजाचा मोर्चा
By Admin | Updated: August 7, 2014 23:57 IST2014-08-07T23:57:20+5:302014-08-07T23:57:20+5:30
धनगर समाज महासंघ व मल्हार सेनेच्या वतीने शेकडो मेंढय़ासह समाज बांधवाच्या उपस्थितीत भव्य मोर्चा

शेगावात धनगर समाजाचा मोर्चा
शेगाव: धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळण्यासाठी धनगर समाज महासंघ व मल्हार सेनेच्या वतीने शेकडो मेंढय़ासह समाज बांधवाच्या उपस्थितीत आज ७ ऑगस्ट रोजी शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला. स्थानिक धनगर नगरापासून सुरुवात झालेला हा मोर्चा यशवंतदादा बुरुंगले, अशोकराव देवकते व इतर पदधिकार्यांच्या नेतृत्वात तहसिल कार्यालयापर्यंत काढण्यात आला. या मोर्चामध्ये शेकडो मेंढय़ासह धनगर समाज बांधव पारंपारीक वेशभुषेत शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते. ह्ययळकोट यळकोट जय मल्हार, आम्हाला आमचा हक्क मिळालाच पाहीजे, आघाडी सरकारचा धिक्कार असो अशा गगनभेदी घोषणा मोर्चाच्या दरम्यान देण्यात आाल्या. हा मोर्चा शिवाजी चौक, अग्रेसन चौक, रेल्वे स्टेशन मार्गे, तहसिल कार्यालयावर धडकला. त्यानंतर तहसिलच्या आवारात धनगर समाजनेते शरद वसतकार, अशोकराव देवकते, दादासाहेब बुरुंगले, अलकाताई गोडे, विजय खरात, भारत वाघ, शत्रुघ्न पाचपोर, भारिप-बमसं जिल्हाध्यक्ष अशोक सोनोने, भाजप जिल्हा सचिव प्रदिप सांगळे आदिंनी मार्गदर्शन केले. यानंतर तहसिलदारांना मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात माजी नगराध्यक्ष शिवाजीराव बुरुंगले, प्रमोद सुळ, शिवाजी कांबळे, अमोल पिंगळे, केशव हिंगणे, बाळु बुरुंगले, संतोष माने, संतोष पिंगळे, हनुमान बुरुंगले, प्रकाश विरकर, गणेश ढाळे, अमर बोरसे, मंगेश करे, राजाभाऊ पालवे, मुना कचरे, अशोक करे, गजानन हजारे, प्रमोद जयस्वाल, रमेश सोलनकर, मनोहर मासाळ, मधुकर मासाळ, अनंता घुले, सतिष सुळ, प्रविण सुरोसे आदिंसह शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते.