भर येथे वीज देयक वसुलीची धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:28 IST2021-07-16T04:28:04+5:302021-07-16T04:28:04+5:30
रिसोड वीज वितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता हरीष गिऱ्हे, लाईनमन नीलेश देशमुख, संदीप मुंढे, प्रकाश मोरे, सचिन कड, विजय सांगळे ...

भर येथे वीज देयक वसुलीची धडक मोहीम
रिसोड वीज वितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता हरीष गिऱ्हे, लाईनमन नीलेश देशमुख, संदीप मुंढे, प्रकाश मोरे, सचिन कड, विजय सांगळे यांच्या ईतर काही कर्मचारी यांनी भर जहागीर येथे १२ जुलै रोजी अवैध वीज जोडणी, आकडे,मीटर बंद करून वीज चोरीसह वीज देयके थकीतची वसुली करण्यासाठी धडक मोहीम राबविली. या दरम्यान वीज ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य करीत एक लाख दोन हजार रुपयांचा तत्काळ वीज देयकांचा भरणा केला. यामध्ये १२,८९० रुपयांची देयके ग्राहकांनी आपल्या मोबाइलद्वारे ऑनलाइन भरली. यावेळी अवैध वीज जोडणी तोडत अनेकांनी टाकलेल्या आकड्यांच्या केबल जमा करण्यात आल्या. वीज बिल थकीतच्या ग्राहकांचे प्रमाण परिसरामध्ये वाढलेले होते. यासाठी वरिष्ठांच्या माध्यमातून थकीत वीज बिल वसुलीची मोहीम राबवली यावेळी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्याचे लाईनमन नीलेश देशमुख यांनी सांगितले.