नवोदय विद्यालयात जंतनाशक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:47 IST2021-09-23T04:47:10+5:302021-09-23T04:47:10+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, सहायक ...

Deworming campaign at Navodaya Vidyalaya | नवोदय विद्यालयात जंतनाशक मोहीम

नवोदय विद्यालयात जंतनाशक मोहीम

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रसाद शिंदे, जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस. डी. खरात, युनिसेफचे डॉ. राजेश कुकडे, उपप्राचार्य सुनीता साखरे, जंतनाशक मोहिमेचे जिल्हा समन्वयक महादेव आवारे, नितीन व्यवहारे, जयश्री भालेराव, स्टाफ नर्स चित्रा अरदळे, अविनाश सोनोने, संदीप जाधव व शिक्षक वर्गाची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या. जे विद्यार्थी आज गोळी घेऊ शकले नाहीत, त्यांना मॉप अप दिनी २८ सप्टेंबरला गोळ्या घेण्यास सांगितले. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील १ ते ६ वर्षे वयोगटातील सर्व बालके, ६ ते १० वर्षे वयोगटातील शाळेत न जाणारी सर्व मुले-मुली, १० ते १९ वयोगटातील शाळेत जाणारी सर्व मुले-मुली आणि याच वयोगटातील सर्व शाळाबाह्य मुले-मुली यांना जंतनाशक गोळ्या खाण्याबाबत आवाहन यावेळी करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर व सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना जंतनाशक मोहिमेच्या आणि पोषण सप्ताहाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार शिक्षिका सुनीता कानोले यांनी मानले.

Web Title: Deworming campaign at Navodaya Vidyalaya