शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

नवे बायोगॅस तंत्रज्ञान विकसित!

By admin | Updated: October 17, 2014 00:08 IST

३0 टक्के जादा जैववायू निर्मिती, डॉ. पंदेकृविचे संशोधन.

राजरत्न सिरसाट/अकोला अपारंपरिक ऊर्जा निर्माण करणार्‍या जैववायू (बायोगॅस)चे नवे तंत्रज्ञान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केले असून, या नवीन तंत्रज्ञानामुळे ३0 टक्के जादा जैववायू निर्मिती केली जात आहे. गॅस सिलिंडर व रॉकेलला सक्षम पर्याय असलेल्या या तंत्रज्ञानाच्या प्रसारावर या कृषी विद्यापीठाने भर दिला आहे. केंद्रीय अपारंपरिक ऊर्जास्त्रोत मंत्रालयाद्वारे देशात जैववायू निर्मिती, राष्ट्रीय प्रकल्प राबविण्यात येत असून, २00६ पर्यंंत या प्रकल्पांतर्गत देशात ३८.३४ लाख कौटुंबिक वा पराच्या जैववायू सयंत्राची उभारणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत विविध प्रकारच्या जैववायू मॉडेल्सचा प्रचार व प्रसार करण्यात आला आहे. कौटुंबिक पद्धतीने उभारलेल्या जैववायू सयंत्रामध्ये गायी, बैल, म्हैस इत्यादी प्राण्यांच्या शेणाचा वापर करण्यात येतो. या सयंत्राला पाण्याची गरज असते; परंतु उन्हाळ्य़ात पाणी मिळत नसल्याने बहुतांश सयंत्र बंद पडले आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या नवीन जैववायू सयंत्रामध्ये ओले शेण पाचन करण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याने हे सयंत्र वर्षभर कार्यरत राहून जैववायू, विजेची गरज पूर्ण करण्याचे काम करीत आहे. या सयंत्रयाचे डिझाईन, मूल्यांकन, तंत्रज्ञान, कुशलता आदीचे यशस्वी परीक्षण या कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाने केले आहे. विकसित सयंत्र ३0 टक्केपेक्षा जास्त बायोगॅस निर्माण करते. या सयंत्राचे सर्व प्रकारचे परीक्षण करण्यात आले आहे. पारंपरिक बायोगॅस सयंत्राला हा उत्तम पर्याय असल्याचे कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाचे डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी स्पष्ट केले. -सुधारित बायोगॅस तंत्रज्ञान-* स्थिर घुमट असलेले नवे सयंत्र* ताजे व ओले शेण भरण्यास योग्य * शेणपाण्याचे मिश्रण करण्याची गरज नाही* सयंत्र भरणे सोपे जाते* मळी लवकर वाळते त्यामुळे वाहतुकीचा खर्च होत नाही.* बांधकामाचा खर्च सामान्य रचनेच्या सयंत्राएवढाच* ३0 टक्केपेक्षा जास्त जैववायूचे उत्पादन या नवीन तंत्रज्ञानामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या सयंत्रापेक्षा ३0 टक्केपेक्षा जास्त जैववायूचे उत्पादन केले जाते. या सुधारित सयंत्राचा धारणाकाळ सामान्य सयंत्रापेक्षा जास्त असल्यामुळे जैववायू उत्पादनात वाढ झाली आहे. या पाचीत मळी बाहेर येण्यासाठी संशोधन करण्यात आले आहे.