जलसाठा असतानाही शेती कोरडीच!
By Admin | Updated: March 15, 2016 02:19 IST2016-03-15T02:19:21+5:302016-03-15T02:19:21+5:30
मुख्यमंत्री, ऊर्जामंत्र्यांच्या आदेशाची अवहेलना.

जलसाठा असतानाही शेती कोरडीच!
देपूळ (जि. वाशिम): चार हजार एकर सिंचन क्षमता असणार्या वारा जहाँगीर सिंचन प्रकल्पात पुरेसा जलसाठा असतानाही केवळ वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतजमीन कोरडीच राहत आहे.
दुष्काळाचा सामना करणार्या वाशिम जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसंबंधी विशेष लक्ष पुरवून १0 बॅरेजेससह वारा जहाँगीर सिंचन प्रकल्पाला विद्युत पुरवठा त्वरित करा, असे आदेश विद्युत वि तरण कंपनीला १५ डिसेंबर २0१५ च्या नागपूर येथील आढावा बैठकीमध्ये ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. असे असताना विद्युत वितरण कं पनीने या प्रकल्पावर विद्युत जोडणी देण्यास सुरुवात केलेली नाही. यामध्ये बहुतांश शेतकरी आ त्महत्याग्रस्त कुटुंबातील व्यक्तीही वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. जलसाठा असताना वीज पुरवठा नसल्याने यावर्षीचा हंगाम कोरडाच गेला. परंतु एप्रिल, मे महिन्यात वीज जोडणी न मिळाल्यास पुढील वर्षीचा खरीप व रब्बी हंगाम कोरडाच जाणार आहे. जर जलसाठा असताना जमीन कोरडीच राहून, या भागात शेतकरी आत्महत्या झाल्यास शासनाने १00 कोटी खर्च करुन तयार केलेल्या सिंचन प्रकल्पाचा काय उपयोग, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. आमदार राजेंद्र पाटणी यांनी सिंचन प्रकल्पाला त्वरित विद्युत पुरवठा मिळावा म्हणून वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांकडून आढावा घेतला. सदर व्यथा ऊर्जामंत्री तथा मुख्यमंत्र्याच्या कानावर टाकली. यावरुन ऊर्जामंत्र्यांनी वाशिमला येऊन या कामाचा आढावा घेतला व वीज जोडणीचे काम त्वरित करण्याचे आदेश ऊर्जामंत्री व मुख्यमंत्र्यांनी दिले. परंतु वीज जोडणीच्या कामाला चक्क वीज वितरण कंपनीने केराची टोपली दाखविल्याचे निर्दशनास येत आहे.
वीज जोडणीच्या कामावर प्रत्यक्ष आमदार पाटणी, ऊर्जामंत्री, मुख्यमंत्री लक्ष देऊन असताना मंगरुळपीर वीज उपविभागांतर्गत येणार्या ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राचे प्रभारी कनिष्ठ अभियंता खंडारे यांच्याकडे सिंचन प्रकल्पावर वीज जोडणी संदर्भातील १00 च्यावर अर्ज धूळ खात पडले आहेत. याउलट वाशिम उपविभागामार्फत याच प्रकल्पावरील वीज जोडणी अर्जाला मंजुरी देऊन नवीन ८ वीज रोहित्र मंजूर केले आहेत. परंतु मंगरुळपीर उपविभागामार्फत एकही नवीन रोहित्र मागणी असून, मंजूर झाले नाही, हे विशेष.