ग्रामपंचायत प्रशासनाने तक्रार देऊनही दारु विक्री सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST2021-06-05T04:28:59+5:302021-06-05T04:28:59+5:30
वनोजा येथील सरपंच डॉ श्रीराम मुखमाले, तंटामुक्ती अध्यक्ष रामेश्वर राऊत यांनी संबंधितांकडे दिलेल्या तक्रारीत गावात व परिसरात अनेक लोक ...

ग्रामपंचायत प्रशासनाने तक्रार देऊनही दारु विक्री सुरुच
वनोजा येथील सरपंच डॉ श्रीराम मुखमाले, तंटामुक्ती अध्यक्ष रामेश्वर राऊत यांनी संबंधितांकडे दिलेल्या तक्रारीत गावात व परिसरात अनेक लोक गावठी दारू भट्टी लावून तसेच काही लोक बाहेर गावावरून देशी- विदेशी दारू आणून विक्री करीत आहेत. तसेच काही विक्रेते तर घरात साठा करून ठेवत आहेत. या दारुमुळे अनेक जण व्यसनाधिन हाेत असून त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. दारुच्या व्यसनामुळे अनेक तरुण चोरीच्या मार्गाचाही अवलंब करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. याकरिता ग्रामपंचायतने दारू विकणाऱ्या विरोधात मंगरूळपीर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली व अनेक वेळा तोंडी ही सांगितले आहे, मात्र अजूनही काेणी लक्ष पुरविले नाही. याकडे पोलीस अधीक्षकांनी लक्ष द्यावे. अशी मागणी वनोजा येथील सरपंच डॉ श्रीराम मुखमाले, तंटामुक्ती अध्यक्ष रामेश्वर राऊत व गावकरी यांनी केली आहे.
गावठी दारू व अवैधरीत्या देशी विदेशी विक्री होत असलेल्या दारु बाबत २६ मार्च राेजी तक्रार व वेळाेवेळी कल्पना दिली आहे. मात्र पोलीस प्रशासनाने दारु विक्री करणाऱ्याविरोधात कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही आहे.
डॉ. श्रीराम मुखमाले, सरपंच वनोजा