आगार व्यवस्थापक म्हणतात प्रवाशांना सुरक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:48 IST2021-09-14T04:48:05+5:302021-09-14T04:48:05+5:30

कोट : एसटी बसेसना आतून बाहेरून अँटिमायक्रोबियल कोटिंग केले जात आहे. यामुळे एसटीच्या कोणत्याही पृष्ठभागावर कोरोना विषाणू टिकू शकणार ...

Depot manager called passenger safety | आगार व्यवस्थापक म्हणतात प्रवाशांना सुरक्षा

आगार व्यवस्थापक म्हणतात प्रवाशांना सुरक्षा

कोट : एसटी बसेसना आतून बाहेरून अँटिमायक्रोबियल कोटिंग केले जात आहे. यामुळे एसटीच्या कोणत्याही पृष्ठभागावर कोरोना विषाणू टिकू शकणार नसल्याने प्रवाशांना कोरोनापासून मोठी सुरक्षा मिळू शकणार आहे. दर दोन महिन्यांनी ही प्रक्रिया पार पाडली जाईल.

- मुकुंद न्हावकर, आगार व्यवस्थापक, कारंजा

--------------

कोट: आगारातील ३९ बसगाड्यांची अँटिमायक्रोबियल कोटिंग प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे या बसेस कोरोनापासून सुरक्षित झाल्या आहेत. एसटीच्या कोणत्याही पृष्ठभागात कोरोनाबाधित व्यक्तीचा स्पर्श झाला तरी विषाणू तत्काळ नष्ट होणार आहे. त्यामुळे इतर प्रवाशांना सुरक्षा मिळेल.

- विनोद ईलामे, आगार व्यवस्थापक, वाशिम

०००००००००००००००००००००००००००००

कोटिंगचा आधार, पण बाधितांचा शोधही घ्यावा

कोट: एसटी बसेसना अँटिमायक्रोबियल कोटिंग केल्याने एखादवेळी बाधित व्यक्ती आधी प्रवास करून गेला असेल, तर त्या आसनावर बसण्याचा धोका इतर प्रवाशाला नसेल, परंतु प्रत्यक्ष बाधित व्यक्तीच शेजारी असेल, तर ओळखावे कसे, त्यामुळे प्रवाशांच्या तपासणीची साेयही हवी.

-नितीन उपाध्ये, प्रवासी

-----------

कोट: एसटीला केलेले अँटिमायक्रोबियल कोटिंग प्रवाशांसाठी फायद्याचेच आहे. यामुळे एसटीचा प्रवास बव्हंशी सुरक्षित झाला आहे. यात तिळमात्र शंका नाही. यामुळे प्रवाशांना दिलासाही मिळेल, परंतु बाधित व्यक्तीचा खोकला, शिंकेतून हवेत पसरणारा कोरोना किती नियंत्रित होईल, हे कळणे कठीणच आहे.

-गजानन डाके, प्रवासी

०००००००००००००००००

जिल्ह्यातील एकूण बसेस- १४१,

कोटिंग झालेल्या बसेस- ११६,

००००००००००००००००००००००००

आगारनिहाय कोटिंग झालेल्या बस

आगार - एकूण बस - कोटिंग झालेल्या

कारंजा - ३८ - २४

मं.पीर - ३२ - ३२

वाशिम - ३९ - ३९

रिसोड - ४२ - २१

-------------------------

एकूण १४१ - ११६

Web Title: Depot manager called passenger safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.