मूलभूत सुविधांचा उडाला बोजवारा

By Admin | Updated: July 19, 2014 01:06 IST2014-07-19T00:43:20+5:302014-07-19T01:06:56+5:30

कर्मचार्‍यांच्या संपाचा परिणाम : कारंजावासीयांचे आरोग्य धोक्यात.

Depletion of basic amenities | मूलभूत सुविधांचा उडाला बोजवारा

मूलभूत सुविधांचा उडाला बोजवारा

कारंजालाड : येथील नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलनाचे हत्यार उगारल्याने नागरिकांना मिळणार्‍या मुलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे.
स्थानिक रहिवाशांना मुलभूत सुविधा देण्यासाठी नगरपालिका प्रशासन कटिबद्ध असते. मात्र मागील तीन दिवसापासून ज्यांच्यावर शहर स्वच्छता अथवा इतर मुलभूत सुविधा देण्याची जबाबदारी आहे तेच अधिकारी तथा कर्मचारी संपावर गेल्याने शहर स्वच्छतेचे गणित विस्कटले आहे. मागील तीन ते चार दिवसापासून दररोज पाऊस बरसत असल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. उघड्या नालीत रस्त्यावरील कचरा वाहून जात असल्याने नाल्या तुंबून परत तो घाण कचरा रस्त्यावर येत आहे. त्यामुळे शहराच्या सखल भागात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नगर परिषदेचे कर्मचारी संपावर गेल्याने काही ठिकाणी कचर्‍याचे ढिगारे तसेच पडून आहेत. नाल्यांची स्वच्छता थांबली आहे. तत्कालिन नगराध्यक्ष संजय काकडे यांनी माळीपुरा परिसरातील धाप्याचे खोदकाम केले. मात्र काम पूर्ण झाले नसल्याने नागरिकांना ये-जा करण्याकरिता त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अंतर्गत रस्त्यावर खड्डे पडले आहे, हे खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.

Web Title: Depletion of basic amenities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.