कारंजात आढळला डेंग्यूचा रुग्ण

By Admin | Updated: August 14, 2015 01:02 IST2015-08-14T01:02:58+5:302015-08-14T01:02:58+5:30

मंगरुळपीर तालुक्यातील पोटी पारवा येथील बालक आढळला रूग्ण.

Dengue sufferers found in fencing | कारंजात आढळला डेंग्यूचा रुग्ण

कारंजात आढळला डेंग्यूचा रुग्ण

कांरजा लाड (जि. वाशिम): येथील एका बालरुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाला डेंग्यूची लागण झाली असल्याची माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. नवल सारडा यांनी १३ ऑगस्ट रोजी दिली. मंगरुळपीर तालुक्यातील पोटी पारवा येथील मनीष शंकर भगत या १0 वर्षीय मुलाला तीन दिवसांपूर्वी ताप आल्याने त्याच्यावर मंगरुळपीर येथील रूग्णालयात उपचार करण्यात आले; परंतु उपचाराला प्रतिसाद न मिळाल्यामुळे रुग्णाच्या आजाराचे निदान लावण्यासाठी काही तपासण्या करून घेतल्या. या तपासण्यांवरून मनीष भगत याला डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

Web Title: Dengue sufferers found in fencing