‘डेंग्यू’चा उद्रेक!
By Admin | Updated: November 12, 2014 01:51 IST2014-11-12T01:51:03+5:302014-11-12T01:51:03+5:30
इंझोरी व इचा येथील बालिकेचा मृत्यू : आरोग्य विभागाचे दुर्लक्ष.
_ns.jpg)
‘डेंग्यू’चा उद्रेक!
वाशिम : सध्या सर्वत्र ह्यडेंग्यूह्ण या आजाराने धुमाकूळ घातला असून, रुग्णांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. वाशिम जिल्हय़ातही डेंग्यूचे सदृश्य रुग्ण मोठया संख्येत आढळून येत असून, हे रूग्ण शासकीय रूग्णालयासह खासगी रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. जिल्हय़ातील मानोरा तालुक्यातील एक व मंगरूळपीर तालुक्यातील एक मुलीचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाल्याची घटना ६ ते ११ नोव्हेंबर दरम्यान घडल्यात. गत महिन्यात जिल्हा प्रशासनाकडे चार रुग्ण डेंग्यू आजाराचे असल्याचे निष्पन्न झाले होते; तसेच १३0 डेंग्यूसदृश रूग्ण आढळले. उपचारानंतर हे सर्व रुग्ण मात्र बरे होऊन त्यांची प्रकृती सुधारली होती; मात्र नोव्हेंबर महिन्यामध्ये या रूग्णांच्या संख्येमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत असून, आरोग्य विभागाच्यावतीने डेंग्यू आजार नियंत्रणाबाबत उपाय योजना सुरू आहेत. घर व घराच्या परिसरातील अस्वच्छता, साचलेले धरण पाण्याचे डबके भंगारात पडलेले टायर, पाणी साचलेले कूलर अशा विविध कारणांमुळे डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यूसारखा महाभयंकर आजार होण्याची शक्यता असते. डासांच्या चावल्यामुळे ताप येणे, डोके दुखणे, सर्दी होणे अशक्तपणा येणे अशीही सुरुवातीची लक्षणे साधा डेंग्यू म्हणून ओळखली जातात, यानंतर त्या रुग्णांना वांती होणे, लघवीतून रक्त जाणे, अंगावर रक्ताचे लाल रंगाचे डाग पडणे, हे डेग्यूंची दुसरी पायरी होय.तर डेंग्यू शॉक सिंद्रोम म्हणजेच शंभर टक्के डेग्यूंचा आजार जडलेला रुग्ण होय. यामध्ये रुग्णांना श्वासोच्छवास होण्यास त्रास होतो, ही तिसरी पायरी आहे. या परिस्थितीमध्ये पोहोचलेल्या रुग्णास ह्यफ्रेश प्लेटलेटह्ण देऊन उपचार केला जातो. सद्यस्थितीत डेंग्यूची भीती सर्वसामान्यांत दिसून येत आहे. आरोग्य विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.