सोयाबीन कुटाराची सकसता वाढविण्यासंदर्भात प्रात्यक्षिक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 14:36 IST2018-07-10T14:35:13+5:302018-07-10T14:36:41+5:30
वाशिम - सोयाबीनच्या कुटारावर युरियामिश्रीत करून कुटाराची सकसता कशी वाढविता येईल, यासंदर्भात आमखेडा येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वाशिम तालुक्यातील जांभरुण महाली येथे सोमवारी प्रात्यक्षिक कार्यक्रम घेतला.

सोयाबीन कुटाराची सकसता वाढविण्यासंदर्भात प्रात्यक्षिक !
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - सोयाबीनच्या कुटारावर युरियामिश्रीत करून कुटाराची सकसता कशी वाढविता येईल, यासंदर्भात आमखेडा येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वाशिम तालुक्यातील जांभरुण महाली येथे सोमवारी प्रात्यक्षिक कार्यक्रम घेतला.
शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी पशूव्यवसायाकडे वळत आहेत. शेतीची वखरणी, डवरणी आदी कामे करण्यासाठीदेखी बैलांची गरज भासते. अलिकडच्या काळात जनावरांसाठी मुबलक प्रमाणात सकस चारा उपलब्ध होत नसल्याने पशुपालकांसमोर गैरसोयी निर्माण होत आहे. सोयाबीनचे कुटार प्रामुख्याने चारा म्हणून उपयोगात आणले जात आहे. या कुटारावर युरियाची संपूर्ण प्रक्रिया केली तर जनावरांसाठी सकस आहार तयार होऊ शकतो. यासंदर्भात अल्प शेतकºयांना माहिती असल्याने जनजागृतीचा एक भाग म्हणून आमखेडा कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जांभरूण महाली येथील रामेश्वर आत्माराम महाले यांच्या घरी सोयाबीनच्या कुटारावर युरिया मिश्रीत करून कुटाराची सकसता कशी वाढविता येईल याबद्दल प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. कृषीदूत सुमेध मनवर, देवीदास शिंदे, विठठ्ठल मांजरे, सागर कदम, सुमित भरगडे, प्रताप भालेराव आदी विद्यार्थ्यांनी यावेळी कुटारावर युरियाची संपूर्ण प्रक्रिया करून दाखविली. १० किलो कुटारावर ४०० ग्रॅम युरियाचे पाणी करून मिश्रण तयार करावे आणि लहान ताडपत्रीवर पसरवून, त्यानंतर जवळपास २० ते २१ दिवस ते दुसºया ताडपत्रीने झाकून ठेवायचे आहे, असे सांगितले. यामुळे सोयाबीन कुटार अधिक सकस होत असून, जनावरांसाठीही ते पोषक खाद्य ठरते असे उपस्थित विद्यार्थ्यांनी शेतकºयांना सांगितले. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सातपुते, उपप्राचार्य डॉ. उलेमाले, कार्यक्रम अधिकारी प्रा. तापडीया, कार्यक्रम समन्वयक प्रा. देवकते, विषयतज्ञ प्रा. सोमटकर व अन्य प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवित असल्याने कृषिदूतांनी सांगितले.