कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून चारा उपचाराचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:43 IST2021-08-23T04:43:31+5:302021-08-23T04:43:31+5:30
युरियाच्या वापरातून चारा पिकावर उपचार करण्याच्या प्रात्यक्षिकात एक लिटर पाण्यात ५०० ग्रा. गूळ, ५० ग्रा. मीठ व ९ ग्रा. ...

कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून चारा उपचाराचे प्रात्यक्षिक
युरियाच्या वापरातून चारा पिकावर उपचार करण्याच्या प्रात्यक्षिकात एक लिटर पाण्यात ५०० ग्रा. गूळ, ५० ग्रा. मीठ व ९ ग्रा. युरिया एकजीव करून एक किलो वाळलेला चारा वर शिंपडून त्याचे मिश्रण केले आणि हा चारा २१ दिवसांनी गुरांना खायला देण्याचा सल्ला कृषी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना दिला. यावेळी शेतकरी अतुल दांदळे, योगेश खिलारी हे शेतकरी उपस्थित होते. प्रात्यक्षिकासाठी त्यांना कृषी महाविद्यालय रिसोड येथील समन्वयक तथा कीटक शास्त्रज्ञ आर. एस. डवरे, प्राचार्य डॉ. ए. एम. अप्तुरकर, कार्यक्रम समन्वयक रावे. प्रा. डी. डी. मसुडकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. एन. ए. कंकाळ , प्रा. आर. वाय. सरनाईक व पशुसंवर्धन प्रा. पी. आर. वळसे यांचे मार्गदर्शन लाभले.