‘श्रीं’च्या विसर्जन मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:42 IST2021-09-11T04:42:55+5:302021-09-11T04:42:55+5:30
............... आदिवासीबहुल गावांमध्ये सुविधांचा अभाव वाशिम : जिल्ह्यातील मानोरा व मालेगाव तालुक्यांतील आदिवासीबहुल ३४ गावांमध्ये अद्यापपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचलेल्या ...

‘श्रीं’च्या विसर्जन मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी
...............
आदिवासीबहुल गावांमध्ये सुविधांचा अभाव
वाशिम : जिल्ह्यातील मानोरा व मालेगाव तालुक्यांतील आदिवासीबहुल ३४ गावांमध्ये अद्यापपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. शिक्षण व अन्य स्वरूपातील सुविधांचा त्यात समावेश आहे. सुविधांअभावी ग्रामस्थांच्या प्रगतीला ‘ब्रेक’ लागला असून, याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष पुरवावे, अशी मागणी होत आहे.
..................
वीज देयक वसुलीला प्रतिसाद
वाशिम : शहरातील विद्युत ग्राहकांकडे विद्युत देयकांपोटी तीन कोटींपेक्षा अधिक रक्कम थकीत आहे. ती वसूल करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली असून, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यातच त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता आर. जी. तायडे यांनी शुक्रवारी दिली.
....................
मास्क वापरास अनेकांकडून टाळाटाळ
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाने बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिक बिनधास्त राहत असून, मास्क वापरास अनेकांकडून टाळाटाळ केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांच्या तोंडावर मास्क दिसणे दुर्मीळ झाले आहे.