निवासस्थानांच्या दुरुस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:47 IST2021-08-20T04:47:54+5:302021-08-20T04:47:54+5:30

केनवड परिसरात रिक्त पदाचे ग्रहण वाशिम : केनवड जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये महसूल, पंचायत, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन यासह विविध ...

Demand for repair of residences | निवासस्थानांच्या दुरुस्तीची मागणी

निवासस्थानांच्या दुरुस्तीची मागणी

केनवड परिसरात रिक्त पदाचे ग्रहण

वाशिम : केनवड जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये महसूल, पंचायत, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन यासह विविध विभागातील कर्मचाऱ्यांची १५ ते २० पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

शिरपूरचे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे १९ ते २१ मार्च या कालावधीत अवकाळी पाऊस, वारा व गारपिटीने पिकांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे केले होते. अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा लागून आहे.

इंझोरी येथील पथदिवे दुरुस्तीची मागणी

इंझोरी: पावसाळ्याला सुरुवात झाली असून, या दिवसांत रात्रीच्या सुमारास विजेची अत्यावश्यकता भासते. ही बाब लक्षात घेऊन गावातील काही ठिकाणचे नादुरुस्त असलेले पथदिवे विनाविलंब दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Demand for repair of residences