पिंजर-कारंजा रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी स्लग: संतप्त ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात
By Admin | Updated: May 6, 2014 19:16 IST2014-05-06T19:09:25+5:302014-05-06T19:16:44+5:30
पिंजर: मूर्तिजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील पिंजर-कारंजा रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांसह प्रवाशांनाही या खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले, तसेच अनेक प्रवासीही पाठदुखीने त्रस्त झाले आहेत. संबंधित अधिकार्यांनी याची दखल घेऊन त्वरित रस्ता दुरुस्ती न झाल्यास आंदोलन छेडण्याची तयारी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

पिंजर-कारंजा रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी स्लग: संतप्त ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात
पिंजर: मूर्तिजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील पिंजर-कारंजा रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांसह प्रवाशांनाही या खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले, तसेच अनेक प्रवासीही पाठदुखीने त्रस्त झाले आहेत. संबंधित अधिकार्यांनी याची दखल घेऊन त्वरित रस्ता दुरुस्ती न झाल्यास आंदोलन छेडण्याची तयारी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
पिंजर-कारंजा रस्ता हा पिंजरसह परिसरातील लोकांसाठी महत्त्वाचा असून, या रस्त्यावर पिंजर परिसरातील अनेक खेडी आहेत. या रस्त्यावरून परिवहन महामंडळाच्या गाड्यांसह खासगी वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते आणि दररोज शंभरच्यावर विद्यार्थी तसेच शेकडो प्रवासी विविध वाहनांतून प्रवास करीत असतात. या रस्त्याची अवस्था खूपच वाईट झाली असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी, तर रस्ताच दुभागल्यासारखी स्थिती दिसून येते. यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना असहनीय असा त्रास होत आहे. खड्ड्यांमुळे धक्के बसून दुचाकीसह बसगाड्यांसारखी वाहने खिळखिळी झालीच शिवाय कित्येक प्रवाशांनाही पाठदुखीचा त्रास सुरू झाला आहे. असे असतानाही मूर्तिजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती करण्याची तसदी घेतली नाही. वाहनधारक आणि प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली असून, ती पूर्ण झाली नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)