पशुधन चोरी व गोवंश कत्तल रोखण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:45 IST2021-09-27T04:45:44+5:302021-09-27T04:45:44+5:30

ठाणेदारांना दिलेल्या निवेदनात असे नमूद आहे की, मानोरा तालुक्यासह संपूर्ण वाशिम जिल्ह्यात अनेक दिवसांपासून गाय,वासरे,बैल,बकरी,म्हशी आदि पशुधनाच्या चोऱ्या ...

Demand for prevention of livestock theft and slaughter of cattle | पशुधन चोरी व गोवंश कत्तल रोखण्याची मागणी

पशुधन चोरी व गोवंश कत्तल रोखण्याची मागणी

ठाणेदारांना दिलेल्या निवेदनात असे नमूद आहे की, मानोरा तालुक्यासह संपूर्ण वाशिम जिल्ह्यात अनेक दिवसांपासून गाय,वासरे,बैल,बकरी,म्हशी आदि पशुधनाच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. या संदर्भात विविध पोलीस ठाण्यांत पशुपालकांनी तक्रारीसुद्धा दिल्या असून, चोरीस गेलेल्या गायी, गोऱ्ह्यांची कत्तल करून गोमांसाची निर्यात केली जात आहे. त्यामुळे शेतकरी व हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या जात आहेत. याची दखल घेऊन याबाबत सखोल चौकशी करावी आणि आरोपींवर गुन्हे दाखल करावे, अन्यथा विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाकडून जिल्हाभर आंदोलन केले जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर अभिषेक चव्हाण, मयूर तंवर, सौरव राठोड, लखन राठोड, शैलेश गिरी, मंगेश पखमोडे, गोपाल कड़बे, विनोद सुरजुसे, अंकित पाटील, पवन खोड़के यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

------------

Web Title: Demand for prevention of livestock theft and slaughter of cattle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.