अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना सरसकट मदतीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:42 IST2021-07-31T04:42:02+5:302021-07-31T04:42:02+5:30
मानोरा पंचायत समितीच्या सभागृहात सभापती सागर प्रकाश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली २८ जुलै रोजी मासिक सभा पार पडली. ...

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना सरसकट मदतीची मागणी
मानोरा पंचायत समितीच्या सभागृहात सभापती सागर प्रकाश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली २८ जुलै रोजी मासिक सभा पार पडली. तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले, घराची पडझड झाले अशांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, असा प्रस्ताव पं. स. सदस्य अभिषेक चव्हाण यांनी मांडला. याला पं.स .चे गटनेते गोपाल भोयर यांनी अनुमोदन दिले. मासिक सभेला विविध विभागातील अधिकारी,कर्मचारी वारंवार गैरहजर राहत असल्यामुळे त्या विभागाचे प्रश्न असेच राहून जात असल्यामुळे त्या अधिकारी कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी आग्रही भूमिका गोपाल पाटील यांनी घेतली, हा मुद्दा सुद्धा ठरावात घेऊन मोहव्हान येथील ग्रामपंचायत सचिव यांनी दिव्यांग बांधवांना त्यांचा हक्काचा निधी वाटप न केल्यामुळे त्या सचिवाला निलंबित करावे व तालुक्यातील अजून किती ग्रामपंचायतने दिव्यांग बांधवांचा निधी दिला नाही याची चौकशीकरिता एक समिती नेमण्यात यावी अशी मागणी पाटील यांनी केली. मासिक सभेला पं स सदस्य गोपाल पाटील,अभिषेक चव्हाण,सचिन घोडे, रेखाताई पडवाळ,रेखाताई श्याम राठोड,विस्तार अधिकारी संजय भगत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पं.स. सदस्य गोपाल पाटील, अभिषेक चव्हाण, सचिन घोडे, रेखा पडवाळ, रेखा श्याम राठोड, विस्तार अधिकारी संजय भगत उपस्थित होते.
--------------
इतरही विविध ठराव
मानोरा तालुक्यातील रतनवाडी रस्त्यावरील धरणाजवळील सांडव्याच्या पाण्यामुळे पूल खचला तो दुरुस्त करण्यात यावा, फुलउमरी ते गहूली रस्त्याचे काम बंद ठेवणाऱ्या त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून काम तत्काळ सुरू करावे, फुलउमरी ते भुली रस्त्याचे काम मार्गी लावण्यात यावे आदी महत्त्वाचे ठराव मासिक सभेत पं स सदस्य अभिषेक चव्हाण यांनी लावून धरले व तसा ठराव संमत करण्यात आला.