वाशिम जिल्ह्यात ५७ ठिकाणी चारा डेपो सुरू करण्याची मागणी
By Admin | Updated: July 19, 2014 01:07 IST2014-07-19T00:40:54+5:302014-07-19T01:07:09+5:30
पशुसंवर्धन-दुग्धव्यवसाय विषय समितीची सभेतील मागणी

वाशिम जिल्ह्यात ५७ ठिकाणी चारा डेपो सुरू करण्याची मागणी
वाशिम : जिल्हय़ात ५७ ठिकाणी पशुसाठी चारा डेपो सुरु करण्याचा ठराव पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विषय समितीच्या सभेत पारित करण्यात आला. जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमेंद्र ठाकरे यांच्या सभापती कक्षात आज (दि.१८) पशुसंवर्धन विषय समितीची सभा पार पडली. यावेळी विविध ठराव पारित करण्यात आले आहेत.
या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती हेमेंद्र ठाकरे तर सचिव म्हणून प्रभारी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जोशी यांची उपस्थिती होती. यावर्षी मृगनक्षत्र कोरडा गेला आहे. पावसाळ्यात आतापर्यंत जिल्हय़ात अल्प प्रमाणात पाउस झाल्यामुळे चारा टंचाई निर्माण झालेली आहे. जिल्हय़ात ६२ हजार ७८१ लहान जनावरे व २ दोन ४१ हजार ५६२ मोठी जनावरे असे एकूण ३ लाख ४ हजार ३४३ पशुधन आहे. पावसाअभावी जुलै २0१४ नंतर चारा मिळणे अशक्य होणार आहे. त्यामुळे या चाराटंचाईचे काळात जिल्हय़ात चारा डेपो उघडणे आवश्यक आहे. याबाब तचा ठराव पशुसंवर्धन समितीने घेऊन उचित कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांच्याकडे सादर केला आहे.
चारा टंचाई काळामध्ये फक्त कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये चारा डेपो चालू न करता जिल्हय़ातील सर्व ५२ जिल्हा परिषद गण व ५ कृषि उत्पन्न बाजार समिती व उपबाजार समितीमध्ये चारा डेपो चालू करण्यात यावा. जिल्हय़ातील अस्तित्वात असलेल्या ११ ठिकाणच्या कृषि उत्पन्न बाजार समिती व उपबाजार समितीमध्ये चारा डेपो चालू केल्यास यापासून दुरचे पशुपालकांना ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. दुबार पेरणीचे खर्चामुळे कास्तकार हैरान झालेला आहे. यामुळे जिल्हय़ा तील लहान जनावरांना प्रत्येकी ५ किलो व मोठय़ा जनावरास प्रत्येकी २0 किलो पशुचार्याचे वाटप करण्यात यावे, असा ठराव घेऊन जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आला.