हुंड्याच्या मागणीसाठी ‘त्याने’ मोडले लग्न !
By Admin | Updated: April 23, 2017 00:53 IST2017-04-23T00:53:14+5:302017-04-23T00:53:14+5:30
वरपक्षाकडील सात जणांविरुध्द गुन्हा दाखल.

हुंड्याच्या मागणीसाठी ‘त्याने’ मोडले लग्न !
मानोरा(जि. वाशिम) : मुलीच्या साक्षगंधाचा कार्यक्रम उरकल्यानंतर, वर पक्षाने लग्नासाठी चक्क दोन लाख रुपयांची मागणी केल्याची घटना मानोरा येथे २१ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी वधु पित्याच्या तक्रारीवरून मानोरा पोलिसांनी वर पक्षाकडील ७ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला.
मानोरा शहरातील मुंगसाजीनगर येथील फिर्यादीच्या मुलीचा लग्न संबंध दहातोंडा येथील मुलाशी जुळला. समाजातील रितीरिवाजाप्रमाणे १९ फेब्रुवारीला रितसर साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपला; मात्र वराकडील लोकांनी ऐनवेळी वधुपित्याला दोन लाख रुपयांची मागणी केली. हुंड्याची पुर्तता न झाल्याने ऐनवेळी लग्न मोडले. या प्रकारामुळे चिंतीत झालेल्या वधु पित्याने मानोरा पोलिसात धाव घेतली. मानोरा पोलिसांनी किशोर ज्योतीराम पवार, ज्योतीराम जमला पवार, गंगाबाई ज्योतीराम पवार, संजय चरणसिंग राठोड, फुशराम चव्हाण, संदीप फुशराम चव्हाण व राजुसिंग राठोड यांचाविरुद्ध हुंडा प्रतिबंधक अधिनियम कलम ४, भादंवी ५0६ नुसार गुन्हा दाखल केला.