नाल्यांची सफाई करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:51 IST2021-06-09T04:51:08+5:302021-06-09T04:51:08+5:30

मानोरा परिसरात रविवारी पावसामुळे वाहून येणारे पाणी व सांडपाणी यामुळे नाल्या भरून वाहत आहेत. नाली जवळ असलेल्या अनेकांच्या ...

Demand for cleaning of nallas | नाल्यांची सफाई करण्याची मागणी

नाल्यांची सफाई करण्याची मागणी

मानोरा परिसरात रविवारी पावसामुळे वाहून येणारे पाणी व सांडपाणी यामुळे नाल्या भरून वाहत आहेत. नाली जवळ असलेल्या अनेकांच्या घरात, दुकानात पाणी शिरले आणि नुकसान झाले. मानोरा-दिग्रस रोडचे काम सुरू आहे; मात्र संबंधित कंत्राटदार यांनी नालीचे काम पूर्ण केले नाही. परिणामी वाहून येणारे पाणी रस्त्यावर आले, काहींच्या दुकानात शिरले होते. म्हणून रस्ते कंपनी यांनी रोड लगत असलेली नाली लवकर बांधून पूर्ण करावी व नगर पंचायतीने गावातील अंतर्गत नाल्याची सफाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

............

नगरपंचायतीने शहरातील सर्वच प्रभागांमधील नाल्यांची साफसफाई आतापर्यंत करायला पाहिजे होती; मात्र ती केल्याचे दिसत नाही. रविवारी आलेल्या पावसाचे पाणी अनेकांच्या घरात, दुकानात शिरले होते. याकडे नगर पंचायतीने लक्ष द्यावे.

- देवराव राठोड (नाईक)

अध्यक्ष, राष्ट्रीय बंजारा विकास मिशन

Web Title: Demand for cleaning of nallas