समाजात तेढ निर्माण केल्याबद्दल कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:22 IST2021-02-05T09:22:33+5:302021-02-05T09:22:33+5:30
खासदार भावना गवळी यांच्या विरोधात बदनामीकारक पोस्ट व्हायरल करून समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी त्वरित चौकशी करून दोषीविरुद्ध कठोर ...

समाजात तेढ निर्माण केल्याबद्दल कारवाईची मागणी
खासदार भावना गवळी यांच्या विरोधात बदनामीकारक पोस्ट व्हायरल करून समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी त्वरित चौकशी करून दोषीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गजानन नागोराव ठेंगड़े यांनी वाशिम शहर पोलिस स्टेशनला बुधवारी दिलेल्या तक्रारीव्दारे केली आहे.
गजानन ठेंगडे, रा. गोंदेश्वर यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले की, हरीशकुमार गोवर्धन सारडा यांनी २८ जानेवारी रोजी दुपारी फेसबुकवर त्यांच्या स्वत:च्या अकाऊंटवरून एक पोस्ट व्हायरल केली असून खासदार भावना गवळी यांच्या वाशिम येथील जनशिक्षण कार्यालयात आपणास जीवे मारण्याबाबतचा कट रचल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारचे काहीही घडले नसून खासदार भावना गवळी यांची बदनामी व्हावी या उद्देशाने सारडा यांनी ही पोस्ट केली आहे. सारडा यांनी समाजात तेढ निर्माण होण्याच्या उद्देशाने तसेच लोकांच्या धार्मिक भावना दुखतील अशी पोस्ट केली आहे. सारडा यांनी शहरातील विकास कामे थांबविण्याकरिता इंटरनेटवर समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट व्हायरल करून तसेच जातीय भावना दुखावल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कार्यवाही करावी, अशी मागणी ठेंगड़े यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.