‘त्या’प्रकरणी ग्रा.पं., महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:30 IST2021-05-28T04:30:19+5:302021-05-28T04:30:19+5:30
निवेदनात नमूद आहे की, वाकद ग्रामपंचायतीने २००४ मध्ये व्यापारी संकुलाचे बांधकाम केले. त्यावेळी तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने बेसमेंटमध्ये तात्पुरत्या स्वरूपात ...

‘त्या’प्रकरणी ग्रा.पं., महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी
निवेदनात नमूद आहे की, वाकद ग्रामपंचायतीने २००४ मध्ये व्यापारी संकुलाचे बांधकाम केले. त्यावेळी तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने बेसमेंटमध्ये तात्पुरत्या स्वरूपात कच्चे बांधकाम करून दुकाने लावण्यास संमती देण्यात आली होती. पुढील दोन वर्षांत जोत्याच्या वर गाळ्याचे बांधकाम करून कायमस्वरूपी भाडेपट्टयाने दुकान देण्याचे कबूल करण्यात आले होते. त्यानुसार, कच्चे बांधकाम करून दुकाने सुरू केली. संतोष चोपडेने मंडप डेकोरेशन, सय्यद हसन सय्यद रसूल यांनी लाल मिर्ची विक्री, नंदा जमदाडे यांनी कटलरी व साडी विक्री, देविदास खोलगडेने सुतारी व मोहसीनखा दौलतखा यांनी भुसार माल व्यवसाय थाटला. संबंधितांचा दुकानांवर २००५ पासून ताबा आहे. त्या सर्वांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह यावरच अवलंबून आहे. दुकानाचे प्रतिमाह ३०० रुपये भाडे देण्यास आम्ही तयार आहोत. असे असताना अतिक्रमणाचा आरोप करून कार्यवाही करण्यात आली. ती बेकायदेशीर असून ग्रामपंचायत सचिव, सरपंचांसह संबंधित महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सय्यद हसन सय्यद रसूल, संतोष चोपडे, नंदा जमदाडे, देविदास खोलगडे, मोहसिनखा दौलतखा यांनी केली आहे.