शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानाच्या अंतीम अहवालास लागणार विलंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 14:51 IST

नुकसानाचे अंतीम अहवाल तयार करून ते विभागीय आयुक्त व पिकविमा कंपन्यांकडे पाठविण्यास विलंब लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अवकाळी पावसामुळे झालेल्या पिक नुकसानाच्या लिखीत पंचनाम्यांमध्ये बऱ्याच त्रुटी असून त्या पूर्ण करताना तहसील व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. यामुळेच तुलनेने अधिक प्रमाणात असलेल्या नुकसानाचे अंतीम अहवाल तयार करून ते विभागीय आयुक्त व पिकविमा कंपन्यांकडे पाठविण्यास विलंब लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सुमारे १ लाख ७४ हजार ३५७ शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यात वाशिम तालुक्यातील ३१ हजार ५६२, रिसोड ३४ हजार २८७, मालेगाव ३० हजार १६९, मंगरुळपीर २९ हजार २७४, मानोरा १६ हजार ८४९ आणि कारंजा तालुक्यातील ३२ हजार २१६ शेतकºयांचा समावेश आहे. झालेल्या पिकांच्या नुकसानाचे तलाठ्यांनी पंचनामे करून ते तहसील व तालुका कृषी अधिकारी कार्यालयांकडे ८ नोव्हेंबर या अंतीम मुदतीपर्यंत सादर केले आहेत. दरम्यान, ज्या शेतकºयांनी खरीप हंगामात पिकविमा काढलेला नाही, परंतु त्यांच्या पिकांचे नुकसान झाले, असे शेतकरी व पिकविमाधारक शेतकºयांच्या नुकसानाच्या या पंचनाम्यांची ९ नोव्हेंबरपासून प्रशासकीय पातळीवर तथा युद्धस्तरावर पडताळणी करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सहाही तहसील कार्यालये आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयांमध्ये पुरेशा प्रमाणात संगणक, कंत्राटी तत्वावरील संगणक परिचालकांची सोय उपलब्ध करण्यासह कर्मचाºयांच्या सुट्या रद्द करून तथा तलाठी, ग्रामसेवकांना बोलावून अचूक पंचनाम्यांची ‘डाटा एन्ट्री’ करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू असल्याचे रविवारी देखील दिसून आले. प्रत्यक्षात मात्र नुकसानाचे आणि पंचनाम्यांचे प्रमाण कितीतरी पटीने अधिक असल्याने अंतीम अहवाल तयार करून ते विभागीय आयुक्त आणि पिकविमा कंपन्यांकडे पाठविण्यास बराच विलंब लागणार आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत मिळण्यासही प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे एकंदरित चित्र निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्यांची कामे ८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, हे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. काही गावांमधील थोड्याफार प्रमाणातील पंचनामे अद्याप बाकी असून ते देखील सोमवारपर्यंत पूर्ण होतील. दरम्यान, लिखीत स्वरूपातील नुकसानाच्या पंचनाम्यांची आता ‘डाटा एन्ट्री’ केली जात असून त्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. तहसील कार्यालये, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासोबतच जिल्हाधिकारी कार्यालयातही हे काम सुरू आहे. ‘डाटा एन्ट्री आॅपरेटर’ आणि पुरेशा प्रमाणात संगणकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.- ऋषीकेश मोडक, जिल्हाधिकारी, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती