कायमपट्टयाचा ठराव घेवूनही अंमलबजावणीत दिरंगाई; शिवसैनिकांसह झोपडपट्टीधारक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 18:40 IST2018-08-10T18:40:04+5:302018-08-10T18:40:12+5:30
वाशिम : पंतप्रधान आवास योजनेंतर्गंत घरकुल मंजुरी करीता कारंजा लाड शहरातील अतिक्रमण घर, झोपडीधारकांना कायमपट्टे मिळण्यास दिरंगाई होत असल्याने १० आॅगस्ट रोजी शिवसेना पदाधिकारी यांनी झोपडपट्टीधारकासह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

कायमपट्टयाचा ठराव घेवूनही अंमलबजावणीत दिरंगाई; शिवसैनिकांसह झोपडपट्टीधारक आक्रमक
वाशिम : पंतप्रधान आवास योजनेंतर्गंत घरकुल मंजुरी करीता कारंजा लाड शहरातील अतिक्रमण घर, झोपडीधारकांना कायमपट्टे मिळण्यास दिरंगाई होत असल्याने १० आॅगस्ट रोजी शिवसेना पदाधिकारी यांनी झोपडपट्टीधारकासह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करुन सदर प्रश्न त्वरित निकाली काढण्याची मागणी केली.
माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुभाष राठोड यांच्या नेतृत्वात कारंजा शहरातील अतिक्रमणधारकांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर जावून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार राज्यातील सर्वच शहरातील अतिक्रमण घर, झोपडपट्टी धारकांना कायमपट्टे देण्याबाबतचा निर्णय २०१८ च्या मुंबई अधिवेशनात, महसूल व वनविभागाच्या शासन निर्णयात झाला आहे. तसेच यासंदर्भात कारंजा नगरपरिषदेनेही २६ एप्रिल २०१८ रोजी ठराव घेवून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीकरीता पत्र दिले आहे. परंतु यात दिरंगाई होत असल्याने हा प्रश्न रखडलेला दिसून येत आहे. कारंजा शहरात गेल्या ४० ते ५० वर्षांपासून अनेक गरीब कुटुंब अतिक्रमण झोपडीत वास्तव करीत असून नगरपरिषदेचा कर सुध्दा भरत आहेत. त्यांना कायम पट्टे मिळावेत म्हणून शासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा सुध्दा करण्यात आला परंतु न्याय मिळाला नाही. केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गंत घरकुल मंजुरीकरिता स्वताची जागा असल्याची अट घातली आहे. ाय योजनेपासून गरिब, अतिक्रमण घर, झोपडपट्टीधारक वंचित राहू नये म्हणून हे कुटुंब राहत असलेल्या जागेवर त्यांना कायमपट्टे देण्याची मागणी केली आहे. तसेच शासन निर्णयानुसार या अतिक्रमण धारकांना न्याय न मिळाल्यास या गरीब कुटुंबांना सोबत घेवून शिवसैनिक रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा
४शासन निर्णयानुसार अतिक्रमण धारकांना न्याय न मिळाल्यास या सर्व गरीब कुटुंबांना सोबत घेवून शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनासह चर्चेदरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुभाष राठोड यांनी दिला.
४कारंजा नगरपरिषदेने यांसंदर्भात ठराव घेवूनही अंमलबजावणीला दिरंगाई केल्या जात आहे.