The death of a young man after falling from a hill | हिंगोली जिल्ह्यातील युवकाचा डोंगरकड्यावरून पडून मृत्यू 

हिंगोली जिल्ह्यातील युवकाचा डोंगरकड्यावरून पडून मृत्यू 

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव :  ऋषी महाराज संस्थान काम कराड येथे डोंगर कड्यावरून २६ वर्षीय तरुण पडल्याने मृत्यू झाला.  ही घटना ९ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली 
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  सदानंद प्रल्हाद कांबळे रा वांजोळा तालुका जिल्हा हिंगोली हा तामकराड येथे      गेला होता.  डोंगर कड्यावरुन पडून मृत्यू झाल त्याबाबतची माहिती             ऋषी  महाराज संस्थान  तामकराड रेगाव येथील महाराज दत्तात्रय मोहळे यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला दिली.
मालेगाव पोलिसांनी मृतक सदानंद कांबळे यांचा मृतदेह मालेगाव ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करिता पाठवले असून मालेगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोहेका/ ज्ञानदेव भगत, नापोका गाजन काळे, समाधान मोघाड, मंगेश गोपणारायन करीत आहेत.
(प्रतिनिधी)

Web Title: The death of a young man after falling from a hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.