विषारी द्रव्य प्राषण केलेल्या महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: March 22, 2017 17:18 IST2017-03-22T17:18:46+5:302017-03-22T17:18:46+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असताना सदर महिला दगावल्याची घटना मंगळवार २१ रोजी घडली.

विषारी द्रव्य प्राषण केलेल्या महिलेचा मृत्यू
वाशिम : येथील बागवानपुरा परिसरात रहिवाशी असलेल्या तीस वर्षीय महिलेने विषारी औषध प्राषण केले होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असताना सदर महिला दगावल्याची घटना मंगळवार २१ रोजी घडली. उजमा कीसर मो. फईम (३०)असे मृतक महिलेचे नाव असून याप्रकरणी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा सामान्य रुग्णालयातील वार्ड बॉय व्यवहारे यांनी तक्रार दिली की, बागवानपुरा परीसरातील उजमा किसर या महिलेने विषारी द्रव्य प्राषण केल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारा करीता दाखल करण्यात आले होते. दरम्यान, सदर महिलेवर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.पोलिसांनी र्मग दाखल करुन प्रकरण तपासात घेतले आहे.