एकाचा मृत्यू; आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:43 IST2021-07-30T04:43:28+5:302021-07-30T04:43:28+5:30
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय कमी ...

एकाचा मृत्यू; आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय कमी असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी नव्याने २ रुग्ण आढळून आले, तर ४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाल्याची नोंद गुरुवारी घेण्यात आली. मंगरूळपीर व मालेगाव तालु्क्याचा अपवाद वगळता उर्वरित चार तालुक्यांत एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ४१६५३ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०९८४ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर आतापर्यंत ६३६ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
००००
चार तालुके निरंक
गुरुवारच्या अहवालानुसार रिसोड, वाशिम, मानोरा व कारंजा तालुक्यात तसेच मालेगाव व मंगरूळपीर शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही. गुरुवारीदेखील जिल्ह्यातील एकाही प्रमुख शहरात कोरोना रुग्ण आढळून आला नसल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.
०००००००
३२ सक्रिय रुग्ण
गुरुवारच्या अहवालानुसार नव्याने २ रुग्ण आढळून आले, तर ४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ३२ रुग्ण सक्रिय आहेत.