शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases in Washim : एका जणाचा मृत्यू;  नव्याने ४३७ बाधित, ४६९ जणांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 10:34 IST

Corona Cases in Washim : मंगळवारी (दि. १८) आणखी एका जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर ४३७ कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असला तरी मंगळवारी दिलासादायक आकडे समोर आले. नवीन बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचा आकडा अधिक असल्याने जिल्हावासीयांना किंचितसा दिलासा मिळाला. मंगळवारी (दि. १८) आणखी एका जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर ४३७ कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. दुसरीकडे ४६९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहेत. सोमवारी नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या अधिक होती. सलग दुसऱ्या दिवशीही नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मंगळवारी ४३७ नवीन रुग्ण आाढळले तर ४६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मालेगाव, रिसोड तालुक्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. मंगळवारच्या अहवालानुसार मालेगाव तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत, तर सर्वात कमी रुग्ण कारंजा तालुक्यात ४५ आढळून आले. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. ग्रामीण भागात स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृहाची सुविधा नसतानादेखील अनेकांना गृहविलगीकरणात ठेवण्यासाठी परवानगी दिली जात असल्याची माहिती आहे. एकाच घरात कोरोना रुग्ण आणि इतर सदस्य राहत असल्याने त्यांनाही संसर्ग होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात गृहविलगीकरणाला परवानगी देताना प्रत्यक्ष पडताळणी केली तर संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. याकडे तालुकास्तरीय यंत्रणेने लक्ष द्यावे, असा सूर ग्रामीण भागातून उमटत आहे. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्याबाहेरील २३ बाधितांची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी) 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम