आणखी एकाचा मृत्यू; ३२ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:29 IST2021-02-05T09:29:33+5:302021-02-05T09:29:33+5:30
जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहे. जिल्ह्यात आणखी एका जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद २८ जानेवारी रोजी ...

आणखी एकाचा मृत्यू; ३२ कोरोना पॉझिटिव्ह
जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहे. जिल्ह्यात आणखी एका जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद २८ जानेवारी रोजी घेण्यात आली. दरम्यान, गुरुवारी ३४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील जवाहर कॉलनी येथील १, गोरे गार्डनजवळील १, महेश नगर येथील १, मंगरुळपीर शहरातील ३, शिवणी येथील १, कवठळ येथील १, मालेगाव शहरातील ६, शेलगाव बोंदाडे येथील ३, घाटा येथील २, भेरा येथील २, राजुरा राव येथील १, चिवरा येथील १, पिंपळा येथील १, कुराळा येथील १, बोर्डी येथील १, रिसोड तालुक्यातील महागाव येथील १, कारंजा शहरातील एम. बी. आश्रम परिसरातील २, वाढवी येथील १, मानोरा तालुक्यातील म्हसनी येथील १, माहुली येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ७,०९५ वर पोहोचला आहे. आतापर्यंत ६,७०७ जणांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत १५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
००
१५७ जणांवर उपचार
आतापर्यंत ७,०९५ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ६,७८४ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.