धोकादायक इमारती अद्याप उभ्याच
By Admin | Updated: July 12, 2014 23:05 IST2014-07-12T23:05:42+5:302014-07-12T23:05:42+5:30
पालिकेची भूमिका बोटचेपी

धोकादायक इमारती अद्याप उभ्याच
वाशिम : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरात पालिकेने केलेल्या सर्व्हेक्षणात १९ इतारती धोकादायक असल्याची धक्कादायक माहीती समोर आली हाती. त्यानंतर पालिकेने या इमारतींच्या मालकांना नोटीस देऊन इमारत पाडण्यासाठी १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. मात्र, १५ दिवस तर सोडाच परंतु तब्बल दीड महिन्याचा कालावधी लोटला असला तरी, या जीवघेण्या इमारती उभ्याच आहेत. विशेष म्हणजे पालिकेनेही दिलेली डेटलाईन संपल्यानंतर काहीच कारवाई केली नाही. यावरून पालीकेची बोटचेपी भूमिकेवर शिक्कामोर्तब होत आहे.
दरवर्षी पावसाळ्याला प्रारंभ होण्यापूर्वी वाशिम शहरातील धोकादायक इमारती, पाणी तुंबण्याचे ठिकाणे, व नैसर्गिक आपत्तीला कारणीभुत असणार्या बाबींचे नगर पालिकेकडुन सर्व्हेक्षण करण्यात येते. यंदाही गत दोन महिन्यापूवी पालिकेने धोकादायक इमारतींचे सर्व्हेक्षण आटोपले. त्यांनतर सदर इमारतींच्या मालकांना नोटीसही दिल्या. १५ दिवसात या इमारतींची दुरूस्ती करावी अथवा त्या जमिनदोस्त कराव्या असा अल्टीमेटम या नोटीसमधून दिला. मात्र नोटीस देऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला तरीही पालिकेने कारवाईची भूमिका घेतली नाही. यातून पालिका त्यांना अभय देत आहे असे म्हणण्याची पाळी आली आहे.
** शासकीय इमारतींचाही समावेश
पालिकेने केलेल्या सर्व्हेक्षणानंतर शहरातील १९ धोकादायक इमारतीच्या मालकांना नोटीस जारी करण्यात आलेल्या आहेत. पावसाळा संपण्यापूर्वी या इमारती दुरूस्त करा, अन्यथा जमिनदोस्त करा अश्या सुचना सदर नोटीसमधून देण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे नगर पालिकेच्या सर्व्हेक्षणात एकाही शासकीय इमारतींची धोकादायक म्हणून नोंद केलेली नाही. वास्तविक शासनाच्या अनेक इमारती आज क्षतीग्रस्त झालेल्या असुन अनेकांचे आयुष्यच संपलेले आहे.
** शहरवासीयांच्या तक्रारीही बेदखल
धोकादायक इमारतींमुळे आमचे जीवनमान धोक्यात आल्याच्या तक्रारी या इमारतींच्या परिसरात राहणार्या नागरिकांनी पालिकेच्या मुख्याधिकार्यांकडे केल्या आहेत. मात्र पालिका प्रशासनाला या तक्रारींची दखल घ्यावी वाटत नाही. सुभाष चौकात राहणार्या रमनलाल सुराण यांची तक्रार याबाबत बोलकी आहे. त्यांनी विजय रंगभाळ यांच्या धोकादाकय इमारतीमुळे आमच्या जीवीतास धोका निर्माण झाल्याचे तक्रारी म्हटले होते. परंतु ही तक्रार केराच्या टोपलीतच पडली .
** दप्तरात १९ ची नोंद प्रत्यक्ष आकडा मोठा
पालिकेने सुरू केलेल्या सर्व्हेक्षणा शहरातील धोकादायक इमारतींची संख्या केवळ १९ असली तरी प्रत्यक्षात हा आकडा यापेक्षा कितीतरी पट मोठा आहे. शहरातील आयुडीपी, लाखाळा, नविन आयुडीपी आदी परसिरातील बांधकाम नविन असले तरी जुने शहर, सिव्हील लाईन आदी ठिकाणी शेकडो वर्षापासूनच्या इमारती उभ्या आहेत. मात्र, यंदा प्रथमच सर्व्हे करणार्या नगर पालिका प्रशासनाने काही दबावापोटी बर्याच इमारतींचा धोकादायकच्या यादीतील समावेश टाळला आहे