बोटांच्या स्पर्शाने कोरोनाचा धोका; मालेगावातील एटीएम निर्जंतुकीकरणाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:08 IST2021-05-05T05:08:27+5:302021-05-05T05:08:27+5:30
कोरोनाच्या संक्रमणाच्या काळात एटीएममध्ये येणारे ग्राहक एटीएम मशीनच्या बटणांना स्पर्श करतात. प्रत्येकाने अशा पद्धतीने मशीनला स्पर्श केला तर कोरोना ...

बोटांच्या स्पर्शाने कोरोनाचा धोका; मालेगावातील एटीएम निर्जंतुकीकरणाच्या प्रतीक्षेत
कोरोनाच्या संक्रमणाच्या काळात एटीएममध्ये येणारे ग्राहक एटीएम मशीनच्या बटणांना स्पर्श करतात. प्रत्येकाने अशा पद्धतीने मशीनला स्पर्श केला तर कोरोना संसर्ग वाढण्याची भीती नाकारता येत नाही.
शहरात स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक यांचे एटीएम आहेत तर, खासगी कंपनीचे एक एटीएम आहे. बँकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळल्या जात असताना एटीएमच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेला असून अत्यावश्यक सेवांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतूक करणारे ट्रकचालक वा वाहक गरजेसाठी एटीएमचा वापर करतात. तसेच एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नसल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. अशातच एटीएममध्ये सॅनिटायझर नसल्याने कोरोना संक्रमित व्यक्तीने एटीएम हाताळल्यास त्यापासून इतर नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे भीतीचे वातावरण आहे. याकडे बँक प्रशासनासह स्थानिक तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केल्या जात आहे.