दलित पँथर करणार शेतकऱ्यांसाठी कार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:46 IST2021-09-22T04:46:41+5:302021-09-22T04:46:41+5:30
दलित पँथर संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक रिसोड तालुक्यातील धोडप येथे १९ सप्टेेंबर रोजी मानवी हक्क अभियान संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष दादासाहेब ...

दलित पँथर करणार शेतकऱ्यांसाठी कार्य
दलित पँथर संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक रिसोड तालुक्यातील धोडप येथे १९ सप्टेेंबर रोजी मानवी हक्क अभियान संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष दादासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली व दलित पँन्थरचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जगदीशकुमार इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीत सर्वानुमते पीक बचाव आंदोलन कृती समिती गठीत करण्यात येऊन या समितीच्या मुख्य संयोजिका म्हणून सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी खंडारे यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली. बैठकीला मार्गदर्शन करताना जगदीशकुमार इंगळे म्हणाले की, राज्यात आघाडी सरकारच्या काळात भूमिहीन लोकांवर अन्यायाचे प्रमाण वाढत आहे. सरकारने जरी हस्तलिखित रेकॉर्डमध्ये पिकांच्या नोंदी उताऱ्यावर घेणे बंद केले असले तरी पीक बचाव आंदोलन कृती समितीच्या झेंड्याखाली अन्यायग्रस्त लोकांनी एकत्र येऊन सहभाग घ्यावा.