बँकांसमोर नागरिकांची गर्दी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST2021-06-05T04:28:49+5:302021-06-05T04:28:49+5:30
ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता वाशिम : ग्रामीण भागातील रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अवलंबून असतात. सर्दी, खोकला, ताप आल्यास ...

बँकांसमोर नागरिकांची गर्दी कायम
ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता
वाशिम : ग्रामीण भागातील रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अवलंबून असतात. सर्दी, खोकला, ताप आल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राचा आधार घेतात, परंतु ग्रामीण भागात डाॅक्टरांची कमतरता असल्याने ग्रामस्थांना त्रास हाेत आहे.
नुकसानभरपाई प्रतीक्षा कायम
वाशिम : शिरपूर गाव परिसरात १९ ते २१ मार्चदरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे विशेषत: कांदा, फळपिके व भाजीपालावर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले. नुकसानभरपाई अद्याप मिळाली नाही. ते देण्याची मागणी आहे.
उन्हाळी ज्वारीचे क्षेत्रात वाढ
मंगरुळपीर : तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी या वर्षी कमी वेळेत येणारे आणि असणाऱ्या गुरा-ढोरांसाठी उपयुक्त असलेल्या उन्हाळी ज्वारीचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला आहे. योग्य नियोजन व परिश्रमाच्या जोरावर भरउन्हात पीक बहरले आहे.
घडीपुस्तिकेत विविध योजनांची माहिती
मंगरुळपीर : अनुसूचित जाती उपयोजना सन २०२०-२१च्या योजनांवर आधारित जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या ‘समता’ या घडीपुस्तिकेत विविध याेजनांची माहिती नागरिकांना मिळत आहे. याचा चांगला फायदा हाेत आहे.
एटीएममध्ये पैशाचा ठणठणाट
वाशिम : शहरातील बहुतांश एटीएममध्ये पैशाचा ठणठणाट असल्याने गुरुवारी सकाळी १० वाजतादरम्यान अनेकांची पंचाईत झाली. बँकांमध्ये गर्दी होऊ नये, म्हणून शहरातील सर्व एटीएमध्ये पुरेशा प्रमाणात पैसे ठेवण्यात यावा.